म.टा.प्रतिनिधी,नगर
पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे कुकडी नदीपात्रात वाळूतस्करांवर कारवाई केल्यानंतर तहसीलदार भारती सागरे व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर डिझेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न बुधवारी केला. पकडलेली वाहने वाळू तस्करांनी पथकावर दगडफेक करून पळवून नेली आहेत. रात्री उशिरापर्यंत पारनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
तालुक्यातील एका गावातील सरपंचाचा मुलगा आणि त्याच्या साथीदाराने हा प्रकार केला असल्याचे तहसीलदार सागरे यांचे म्हणणे आहे. बुधवारी दुपारी तहसीलदार सागरे, तलाठी आणि मंडळाधिकारी, दोन पोलिस कर्मचारी असे तेरा जणांचे पथक कुकडी नदीतील वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. कोहकडी गावातील नदीपात्रात दोन वाळूने भरलेले ट्रॅक्टर व एक पोकलेन या पथकाने पकडले होते. ही वाहने वाळू तस्करांना पळवता नेऊ नयेत म्हणून महसूल कर्मचारी हे ट्रॅक्टरवर बसले होते. तर तहसीलदार सागरे या पोकलेन सीटवर बसल्या होत्या. त्याचवेळी १० ते १५ वाळू तस्कर जमा झाले. त्यातील पोकलेनचा मालक असलेल्या तरुणाने दोन ड्रममध्ये असलेले डिझेल घेऊन पोकलेनवर फेकले. हे डिझेल तहसीलदार सागरे व इतर कर्मचाऱ्यांच्या अंगावर उडाले. पोकलेनसह सर्वांना पेटून देतो, असे म्हणून काडीचे पेटी काढून काडी लावण्याचा प्रयत्न त्याने केला. त्यावेळी महसूल कर्मचारी व पोलिसांनी तहसीलदार सागरे यांना पोकलेनच्या खाली उतरून आपल्या वाहनात बसविले. यामुळे त्या वाचल्या. त्यानंतर वाळूतस्करांनी दगडफेक करून महसूल पथकाने पकडलेली वाहने पळवून नेली. याप्रकरणी पोलिस स्टेशनला तहसीलदार सागरे या फिर्याद देण्यासाठी गेल्या आहेत. उशीरापर्यंत फिर्याद देण्याचे काम सुरू होते.
नदीपात्रात दोन ट्रॅक्टर व एक पोकलेन पकडल्यानंतर वाळूतस्कारांनी हा प्रकार केला आहे. वाहनांवर व माझ्यावर डिझेल टाकून वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर कर्मचाऱ्यांनी मला पोकलेनमधून बाहेर काढल्यामुळे मी वाचले. या परिसरातील एका सरपंचाचा मुलगा व त्याच्या साथीदाराने हा प्रकार केला आहे.
भारती सागरे, तहसीलदार