अ‍ॅपशहर

फिरोदिया शाळेला विजेतेपद

शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या नाट्यवाचन व कथाकथन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद येथील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाने मिळवले.

Maharashtra Times 24 Jan 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम school championship
फिरोदिया शाळेला विजेतेपद

शालेय विद्यार्थ्यांसाठी झालेल्या नाट्यवाचन व कथाकथन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद येथील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाने मिळवले. ज्येष्ठ नाट्य कलावंत पी. डी. कुलकर्णी यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.
भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलमधील माजी विद्यार्थी संघाच्या पुढाकाराने (कै.) पुष्पलता देशमुख नाट्यवाचन व (कै.) सरलाबाई काठेड कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही स्पर्धांचा सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक फिरोदिया हायस्कुलने पटकावला. या स्पर्धेत १५ शाळांतील दीडशेवर विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल असा - कथाकथन स्पर्धा (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय) गट क्रमांक एक- तनुजा नडोने, नंदिनी झंवर व प्रीती जेठे. गट क्रमांक दोन- संस्कार गुंदेचा, ऋग्वेदा कुलकर्णी व पौर्णिमा वाघ. गट क्रमांक तीन-यश जहागीरदार, निवेदिता शिंदे व जान्हवी हिरवे.
अॅड. एस. टी. जोशी, विजय महाजन, सविता जोशी, अॅड. शिरीष जोशी, महेश कुलकर्णी, प्रा. एम डी कुलकर्णी, श्याम जोशी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. पारितोषिक वितरण कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विलास देवी, माजी मुख्याध्यापक अभिमन्यु चव्हाण, सचिव मिलिंद गंधे, कार्याध्यक्ष पद्माकर देशपांडे, गोविंद मुळे, सचिन डागा, अविनाश दायमा आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज