अ‍ॅपशहर

अहमदनगर: विद्यार्थिनीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकाला चोपले

अकोले तालुक्यातील वाघापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लिल वर्तन करत असल्याचे समोर आलेले आहे. ही माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षकाला जाब विचारून चांगलीच धुलाई केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Dec 2019, 6:31 pm
अहमदनगरः अकोले तालुक्यातील वाघापूरमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लिल वर्तन करत असल्याचे समोर आलेले आहे. ही माहिती पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षकाला जाब विचारून चांगलीच धुलाई केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagar




वाघापूरमधील गंभीरवाडीतील जिल्हा प्राथमिक शाळेतील शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लिल वर्तन करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार मुलींच्या पालकांना समजला. त्यानंतर ग्रामस्थ हे गुरुवारी एकत्र येऊन शाळेत आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला याबाबत विचारणा केली. त्यावेळी संतप्त झालेल्या काही महिलांनी संबंधित शिक्षकाची चप्पलाने धुलाई केली आहे. या शिक्षकाने अनेकदा मुलींशी गैरवर्तन केले आहे. याबाबत अनेकदा ग्रामस्थांना संबंधित शिक्षकाला समज दिली होती. त्यानंतर या शिक्षकामध्ये सुधारणा झाली नव्हती. संबंधित शिक्षकाला अकोले पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्य़ाच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज