अ‍ॅपशहर

मोदी आजोबा, करोनाला जगातून नष्ट करा, चिमुरडीचे पंतप्रधानांना पत्र

'मोदी आजोबा, आपण भारतासाठी खूप मोठे मोठे उपक्रम केले आहेत. ते यशस्वीही झाले आहेत. आता करोनाला देशातून आणि संपूर्ण जगातून नष्ट करा,' असे अर्जव नगरमधील भक्ती दीक्षित या शाळकरी मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 5:48 pm
म.टा. प्रतिनिधी, नगर: 'मोदी आजोबा, आपण भारतासाठी खूप मोठे मोठे उपक्रम केले आहेत. ते यशस्वीही झाले आहेत. आता करोनाला देशातून आणि संपूर्ण जगातून नष्ट करा,' असे अर्जव नगरमधील भक्ती दीक्षित या शाळकरी मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pm modi


नगरच्या कायनेटिक चौकात राहणाऱ्या भक्ती सिद्धार्थ दीक्षित या शाळकरी विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली आहे. मोदींना तिने आजोबा संबंधून हे पत्र लिहिले आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या कामाचे कौतूकही केले आहे.

मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले; कंगना म्हणाली...

'ती म्हणते करोना व लॉकडाऊनमुळे खूप कंटाळा आला आहे. करोनामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या शाळा, क्लास व इतर उपक्रम बंद आहेत. करोनामुळे आम्ही घरात कोंडलोय असे वाटते. आम्हाला करोनामुळे खूप बंधने आहेत. या बंधनातून तुम्हीच मुक्त करू शकता. आता आम्हाला शाळेची ओढ लागली आहे. प्लीज काही तरी करा. आपण करोनाच्या विरोधातही फार उपाय केले. माझी तुम्हाला विनंती आहे की या करोना भारतातून नव्हे संपूर्ण जगातून नष्ट करा.'

दरम्यान, बुधवारी देशात दिवसभरात ८३,३४७ नवे रुग्ण आढळल्याने देशाची एकूण रुग्णसंख्या आता ५६ लाख ४६ हजार १० इतकी झाली आहे. तर दिवसभरात एक हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून ९० हजार २० झाली आहे. तर देशात आतापर्यंत ४५ लाख ८७ हजार ६१३ रुग्ण बरे झाले आहेत, असे आरोग्यमंत्रालयाने सांगितले. देशात सध्या नऊ लाख ६८ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू असून, हे एकूण रुग्णसंख्येच्या १७.१५ टक्के आहेत.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज