अ‍ॅपशहर

नागवडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

श्रीगोंदे तालुक्याच्या विकासाचे अध्वर्यू व राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव उर्फ बापूसाहेब नागवडे (वय ८५) यांचे बुधवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईत रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२० सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजता वांगदरी (ता. श्रीगोंदे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra Times 20 Sep 2018, 2:49 am
नगर : श्रीगोंदे तालुक्याच्या विकासाचे अध्वर्यू व राज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव उर्फ बापूसाहेब नागवडे (वय ८५) यांचे बुधवारी (१९ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईत रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (२० सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजता वांगदरी (ता. श्रीगोंदे) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम senior leader nagavade passed away
नागवडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार


वृद्धापकाळाने मागील काही दिवसांपासून नागवडे आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते व पुढील उपचारासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व दीपकशेठ नागवडे आणि तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (कै.) नागवडे यांच्या सूनबाई अनुराधा नागवडे या नगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आहेत.

विकासात्मक कारकीर्द

श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व काँग्रेसचे जुने आणि ज्येष्ठ नेते असलेल्या शिवाजीराव उर्फ बापूसाहेब नागवडे यांची राजकीय कारकीर्द विकासात्मक राहिली. १९ जानेवारी १९३४ रोजी आजोळी कर्जत तालुक्यातील रुईगव्हाण येथे जन्मलेल्या बापूंनी आपले मूळ गाव असलेल्या वांगदरी (श्रीगोंदे) गावचे सरपंचपद ते महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषवली. १९७८ मध्ये अडीच वर्षे व १९९९ मध्ये पाच वर्षे त्यांनी श्रीगोंद्याची आमदारकी गाजवली. तालुक्यात पहिला सहकारी साखर कारखाना व श्रीछत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांची उभारणी करून श्रीगोंद्याच्या विकासाला निश्चित दिशा त्यांनी दिली. राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून साखर उद्योगाला नेहमी अडचणीतून बाहेर काढून आधार दिला.


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज