अ‍ॅपशहर

पोलिसाने केला तरुणीवर लैंगिक अत्याचार

तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर असे आरोपीचे नाव असून तो गृहराज्यमंत्री व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

Maharashtra Times 5 Jul 2017, 11:49 am
मटा ऑनलाइन वृत्त । अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sexual assult charges against police in ahmadnagar
पोलिसाने केला तरुणीवर लैंगिक अत्याचार


तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश रामदास अकोलकर असे आरोपीचे नाव असून तो जलसंधारणमंत्री व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.

आरोपी अकोलकर विवाहीत असून पीडित युवती नगरमध्ये शिक्षणासाठी आली होती. अकोलकरने तिच्याशी ओळख वाढवली आणि गेल्या सहा महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. त्याने बळजबरीने तिचा गर्भपातही केला. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत धाव घेती मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तिने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशन येथे मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अकोलकर सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज