शिर्डी : शिर्डीत आठ वर्षाच्या एका बालिकेवर १४ वर्षाच्या मुलाने बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. पीडित बालिकेवर नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिर्डी शहराला लागून असलेला निमगाव परिसरात मोलमजुरी करणारे कुटुंब राहते. त्यांची आठ वर्षाची बालिका शौचाला जात असताना शेजारी राहणारा १४ वर्षाच्या मुलाने तिला गाठले व आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ही घटना संध्याकाळी सहाच्या दरम्यान घडली. पीडित मुलीवर नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आरोपी मुलाला बाल सुधारगृहात पाठविले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.