अ‍ॅपशहर

चोराचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलिस जखमी

नगर जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Nov 2019, 3:11 pm
अहमदनगरः नगर जिल्ह्यातील राहाता येथे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्याचा चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात राहाता पोलिस स्टेशनचे कर्मचारी अजित पठारे हे गंभीर जखमी झालेले आहेत. तर एका चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gun


जखमी पोलिसांना शिर्डी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणारी टोळी राहाता शहरात आल्याची माहिती राहाता पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस टोळीला पकडण्यासाठी गेले होते. पोलिस व टोळीतील सदस्यांमध्ये झटापट झाली. त्यावेळी एकाने गावठी पिस्तूलमध्ये पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.

गोळीबारात पोलिस कर्मचारी पठारे हे जखमी झाले. तर टोळीतील सचिन काटे याला पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याचे साथीदार पळून गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे हे घटनास्थळी दाखल झाले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज