अ‍ॅपशहर

इस्राइलनंतर हिवरेबाजारच : डॉ. परदेशी

हिवरेबाजार हे राज्यच नाही तर देशासाठी आदर्श असे मॉडेल व्हिलेज आहे. जगभरात इस्राइलनंतर हिवरेबाजार हे वॉटर ऑडिटिंगची संकल्पना राबवणारे गाव आहे,’ असे गौरवोद्गारपंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी काढले.

Maharashtra Times 24 May 2017, 3:00 am
म. टा. वृत्तसेवा, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shrikar pardeshi visits hivre bajar
इस्राइलनंतर हिवरेबाजारच : डॉ. परदेशी


‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून जगाला हिवरेबाजारची महती सांगितली. आम्हीही हिवरेबाजारबद्दल खूपवेळा चर्चा केली. आता प्रत्यक्ष हिवरेबाजारच्या भेटीचा क्षण खूपच आनंददायी आहे. हिवरेबाजार हे राज्यच नाही तर देशासाठी आदर्श असे मॉडेल व्हिलेज आहे. जगभरात इस्राइलनंतर हिवरेबाजार हे वॉटर ऑडिटिंगची संकल्पना राबवणारे गाव आहे,’ असे गौरवोद्गारपंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी काढले.

राज्यातील पिंपरी चिंचवड, पुणे, यवतमाळ जिल्ह्यांमधील कारकिर्द गाजवल्यानंतर डॉ. परदेशी यांना पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले. डॉ. परदेशी हे राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे स्नेही आहेत. आपल्या कुटुंबासमवेत ते खास दिल्लीहून हिवरेबाजारच्या भेटीसाठी आले होते. गावाचा परिसर फिरून त्यांनी माहिती घेतली. नागरिकांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘लोकसहभाग व सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शीपणे काम केले तर चांगले काम उभे राहू शकते. प्रत्यक्ष पाहणीनंतर ग्रामविकासाबाबत नवीन संकल्पना राबविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात माहिती दिली जाईल. राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवारप्रमाणे ग्रामविकासाबाबत काय करता येईल यासाठीही हिवरेजाबाजारचे संदर्भ घेतले जातील. हिवरेबाजारने खूप प्रगती साधली आहे. दीड हजार लोकसंख्येच्या गावात एटीएम, राष्ट्रीय बँक असणे यातूनच गावाच्या प्रगतीचा ध्यास दिसून येतो. केंद्र सरकारने अनेक लोकोपोउपयोगी प्रकल्प राबविण्यावर भर दिला आहे. त्यानुसार २०२२ पर्यंत सर्वांना घरे, ५००पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली गावे २०१९ पर्यंत पंतप्रधान ग्रामसडक योजनेद्वारे रस्त्याने जोडली जाणार आहेत. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्वांना रोजगार व नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे.’परदेशी यांनी गावातील जलसंधारणाची कामे, ट्रेनिंग सेंट्ररची उभारणी, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, ग्रामसचिवालय यांची पाहणी केली.

चौकट ः

तर हरियाणाप्रमाणे कुस्तीपटू घडतील

डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते गावात ओपन जिमचेही उद‍्घाटन या वेळी करण्यात आले. ते म्हणाले की, देशातील हरियाणा, पंजाब प्रमाणे आपल्याकडे मातीतील कुस्तीऐवजी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिले तर ग्रामीण भागातील खेळाडूंनाही ऑलिंपिकची संधी मिळू शकेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज