अ‍ॅपशहर

माजी उपमहापौर छिंदम १० डिसेंबरपर्यंत तडीपार

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महापालिका निवडणूक काळात शहरबंदी करण्यात आली आहे. छिंदम याला दहा डिसेंबरपर्यंत नगर शहरातून तडीपार करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत. दरम्यान, छिंदम हा सर्जेपुरा-बागडपट्टी-दिल्ली गेट परिसरातील प्रभाग नऊमधून महापालिका निवडणुकीत उमेदवारी करीत आहे.

Maharashtra Times 29 Nov 2018, 3:21 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shripad chhindam tadipaar from ahmednagar
माजी उपमहापौर छिंदम १० डिसेंबरपर्यंत तडीपार

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणारा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महापालिका निवडणूक काळात शहरबंदी करण्यात आली आहे. छिंदम याला दहा डिसेंबरपर्यंत नगर शहरातून तडीपार करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले आहेत. दरम्यान, छिंदम हा सर्जेपुरा-बागडपट्टी-दिल्ली गेट परिसरातील प्रभाग नऊमधून महापालिका निवडणुकीत उमेदवारी करीत आहे.

महापालिकेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व तडीपारीची कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी नगर उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी महापालिका निवडणूक काळात पाच जणांना नगर शहरातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये श्रीपाद छिंदम याच्यासह ओंकार कराळे, मनोज कराळे, भाऊ कराळे, दिपक खैरे यांचा समावेश आहे. याशिवाय निवडणूक काळात आणखी चौदा जणांना अटी व शर्तीवर नगर शहरामध्ये राहण्याची परवानगी बुधवारी देण्यात आली असून त्यामध्ये खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी, शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांच्यासह चंद्रकांत उजागरे, भुपेंद्र परदेशी, प्रशांत बाळू गायकवाड, संजीव भोर, गजेंद्र सैंदर, नरेंद्र कुलकर्णी, कुमार वाकळे, दिपक आडेप, शिवाजी अनभुले, दिगंबर ढवण, अशोक दहिफळे, प्रकाश सैंदर यांचा समावेश आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज