अ‍ॅपशहर

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावर थेट लडाखमधून बोलले फुंसुक लडाखी; पाहा व्हिडिओ

Sonam Wangchuk: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होत असताना लडाखमधील फुंसुक लडाखी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Aug 2022, 8:02 pm
अहमदनगर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्त्यावरून सध्या वादंग उठलेले असताना लडाखमधील फुंसुक लडाखी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नगरमध्ये ज्ञानेश चव्हाण यांनी अलीकडेच लडाखला भेट दिली होती. त्यावेळी गप्पा मारताना त्यांनी लडाखी यांचा हा व्हिडिओ केला होता. लडाखी हे सोनम वांगचुक यांचे जवळचे मित्र आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भगतसिंग कोश्यारी


यावेळी चव्हाण यांच्याशी बोलताना फुंसुक लडाखी यांनी महाराष्ट्राचे तोंडभरून कौतूक केले आहे. अनेक उदाहरणेही त्यांनी दिली आहेत. विशेष म्हणजे इतर प्रांतातील लोकांना सामावून घेणे आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन या गोष्टी आवडत असल्याचे लडाखी सांगत आहेत. आपण संपूर्ण देशात फिरतो, मात्र महाराष्ट्रासारखे वातावरण पाहिले नाही. तेथे इतर प्रांतातील लोकांना येऊ दिले आणि मोठे होऊ दिले जाते. म्हणूनच अनेक उद्योजक आणि अभिनेते येथे तयार झाले आहेत, असेही लडाखी म्हणत आहेत.

वाचा- रोहित शर्मा आज ठरवूनच मैदानात उतरणार; पाकिस्तानचा महा'रेकॉर्ड' धोक्यात


वाचा- रोहित पवारांच्या मनात राजकारण सोडण्याचा विचार...

गेल्या आठवड्यात नगरचे चहा व हॉटेल व्यावायिक असलेले ज्ञानेश चव्हाण लडाखला गेले होते. त्यावेळी त्यांचा लडाखी यांच्याशी हा संवाद झाला आहे. त्यानंतर राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य आल्यानंतर हा महाराष्ट्राचे कौतूक करणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज