अ‍ॅपशहर

एसटीच्या कॅशलेस बुकिंगला मंजुरी नाही

नगर जिल्ह्यातील २३ बसस्थानकांत कॅशलेस तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय कार्यालयाने पाठविलेल्या प्रस्तावास महामंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही.

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st no cashless ticket booking
एसटीच्या कॅशलेस बुकिंगला मंजुरी नाही


नगर जिल्ह्यातील २३ बसस्थानकांत कॅशलेस तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय कार्यालयाने पाठविलेल्या प्रस्तावास महामंडळाकडून मंजुरी मिळालेली नाही. साडेतीन महिन्यांनंतरही या प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या बसस्थानकांत कॅशलेस तिकीट बुकिंग सुरू होणार का, याविषयी अधिकाऱ्यांतच संभ्रम निर्माण झाला आहे.

बसस्थानकांचे सुशोभीकरण, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर कॅशलेस तिकीट बुकिंगची सुविधा देण्याचा निर्णय विभागीय कार्यालयाने घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २३ महत्त्वाच्या बसस्थानकांचा प्रस्ताव महामंडळाला तत्कालीन विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी मार्च महिन्यात सादर केला होता. या नव्या योजनेसाठी महामंडळातील वरिष्ठ अधिकारी अनुकूल असून प्रस्तावास लवकर मंजुरी मिळेल, असे त्या वेळी सांगितले गेले होते. प्रत्यक्षात मात्र या प्रस्तावावर काहीच कार्यवाही झालेली नाही. बसस्थानकात ही सुविधा सुरू करण्यासाठी स्वाइप यंत्रांची आवश्यकता आहे. बँकांशी संपर्क साधून त्यांच्याकडून यंत्रे घ्यावी लागणार आहेत. तिकीट कसे बुक करायचे याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे लागणार आहे. या सर्व बाबी महामंडळाकडून होणार आहेत; मात्र, महामंडळाकडून यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. प्रस्तावास मंजुरी मिळाली का याचीही माहिती येथील स्थानिक अधिकाऱ्यांना देता येत नाही. हा प्रस्ताव असाच गुंडाळला जाऊन त्यास मंजुरी मिळणार नाही, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज