नगर : नगर शहरात दिवसा घरफोडी करण्याचे सत्र सुरूच आहे. बुरुडगाव रोडवरील एका बिल्डिंगमधील डॉक्टराचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मंगळवारी ही घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डॉ. श्रद्धा भारत पाटील यांनी फिर्याद दिली. श्रद्धा पाटील यांचा बुरुडगाव रोडववरील अष्टगंध बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता त्यांनी फ्लॅटला कुलूप लावले होते. त्यानंतर चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फ्लॅटमधील कपाटाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. श्रद्धा पाटील दुपारी दोन वाजता घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. त्यानंतर कोतवाली पोलिस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.
दिवसा घर फोडून सोने, रोकड चोरीला
नगर शहरात दिवसा घरफोडी करण्याचे सत्र सुरूच आहे...
MT 25 Apr 2019, 4:00 am