अ‍ॅपशहर

छेडछाडीतून वर्गात घुसूनविद्यार्थ्याला मारहाण

नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथील हनुमान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुलीची छेड काढत असल्याच्या कारणातून एका विद्यार्थ्याला वर्गात घुसून मारहाण झाली. या प्रकरणी सात ते दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

Maharashtra Times 14 Sep 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student assault in class
छेडछाडीतून वर्गात घुसूनविद्यार्थ्याला मारहाण

नगर तालुक्यातील खातगाव टाकळी येथील हनुमान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मुलीची छेड काढत असल्याच्या कारणातून एका विद्यार्थ्याला वर्गात घुसून मारहाण झाली. या प्रकरणी सात ते दहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी शिक्षक योगेश दत्तात्रय घोडके यांच्या फिर्यादीवरून नेप्ती गावातील मारूती चौरे, विलास चौरे, आकाश चौरे, वैभव चौरे, सुनील चौरे, अक्षय चौरे व पाच अनोळखी व्यक्ती यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी घोडके हे बारावीच्या सायन्स वर्गात गणित शिकवत होते. त्याचवेळी आरोपी हे आमच्या मुलीची वर्गातील एका मुलाने छेड काढली, असे म्हणून वर्गात घुसले. छेड काढणारा मुलगा न सापडल्याने त्याच्या मित्राला आरोपीने मारहाण केली. त्यावेळी वर्गातील इतर विद्यार्थी ही मारहाण होत असलेल्या विद्यार्थ्याला सोडविण्यासाठी गेले असता त्यांना आरोपींनी शिविगाळ केली.

लष्करी हद्दीतून चंदन चोरी

लष्करी हद्दीतील एएनडी रेजिमेंटच्या हंटर रोड येथील एका चंदनाची झाड चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी कर्नल राजवीर सिंग यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. हंटर रोड येथे बारा फुटी चंदनाचे झाड होते. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेले, असे फिर्यादीत म्हटले आहे. लष्करी हद्दीतून या पूर्वी चंदन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज