नगर : विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणी नेवासा व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले नगरमधील सुरजीतसिंग गंभीर याला नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला. जिल्हा परिषदेत निवडणुकीत वाटलेल्या बनावट दारूमुळे पांगरमल येथे नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नेवासा, भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्या हद्दीत बनावट दारूमुळे दोघांचा मृत्यू झाला होता. तीनही प्रकरणी सुरजीतसिंग गंभीरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पांगरमल गुन्ह्यात गंभीर याला जामीन मिळाला आहे. नेवासा व भिंगारमधील गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अॅड. सतीशचंद्र सुद्रिक यांच्यामार्फत नेवासा व नगर जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. बनावट दारू तयार झालेल्या कॅन्टिनचा करार २०१४ मध्ये संपुष्टात आला होता. त्यामुळे कॅन्टिनबाबत गंभीर याचा काहीही संबंध नाही, असे युक्तिवाद सुद्रिक यांनी केला होता. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून गंभीर याला दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
सुरजीतसिंग गंभीरला अटकपूर्व जामीन
विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याप्रकरणी नेवासा व भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात आरोपी असलेले नगरमधील सुरजीतसिंग गंभीर याला नुकताच अटकपूर्व ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2019, 4:00 am