अ‍ॅपशहर

साडेपाच लाख रोपांचे उद्दिष्ट

राज्य सरकारच्या पन्नास कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २०१८ वर्षातील पावसाळ्यातील रोपे लागवडीच्या कामाच्या नियोजनास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Times 24 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम target of plantation of five lakh plants
साडेपाच लाख रोपांचे उद्दिष्ट


राज्य सरकारच्या पन्नास कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत २०१८ वर्षातील पावसाळ्यातील रोपे लागवडीच्या कामाच्या नियोजनास सुरुवात झाली आहे. वन विभाग वगळता इतर सरकारी कार्यालयांना रोपे लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून यामध्ये नगर जिल्ह्यास ५ लाख ४३ हजार ५१० रोपांचे उद्दिष्ट मिळाले आहे. या रोपांचा पुरवठा वन विभाग करणार आहे. वन विभागास अद्याप उद्दिष्ट निश्चित झालेले नाही.

राज्य सरकारकडून पाच वर्षांत पन्नास कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी वन विभागासह इतर सरकारी विभागांना उद्दिष्ट देण्यात येते. या कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी वन विभागावर आहे. वन विभागाकडून सरकारी कार्यालयांना रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. पुढील वर्षातील पावसाळ्यात लागवड होणार असली तरी त्याचे नियोजन मात्र सुरू झाले आहे. या वर्षात राज्यभरात १३ कोटी रोपे लावली जाणार आहेत. त्यामुळे सरकारी विभागाचे उद्दिष्टही वाढवले आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग, गृह विभाग, पाणीपुरवठा विभाग, महिला व बालविकास कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय आदी सर्वच कार्यालयांना मिळून साडे पाच लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कार्यालयांनी पावसाळ्यापूर्वी खड्डे खोदून रोपे लागवड करायची आहे. रोपे लागवडीसाठी जागा निश्चित करून वन विभागाकडे रोपांची मागणी करण्याच्या सूचना आहेत. वन विभागाचे अधिकारी सरकारी कार्यालयांनी रोपांसाठी खड्डे खोदले आहेत का याची माहिती घेऊनच रोपे देणार असल्याचे सांगण्यात आले.

चौकट ः

२०१७ च्या पावसाळ्यात दीड लाख रोपे लागवड

या वर्षातील पावसाळ्यात जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांनी १ लाख ५७ हजार ७३४ रोपांची लागवड केली आहे. या रोपांची सध्या काय स्थिती आहे. यातील किती रोपे जिवंत आहेत याची माहिती घेण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे. ऑक्टोबर महिन्यात रोपांची माहिती घेऊन सरकारला सादर केली जाणार आहे. यासाठी वन विभागाने समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून माहिती अपलोड करण्यासाठी मोबाइल अॅप तयार केले आहे. या अॅपवर रोपांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज