अ‍ॅपशहर

शिक्षक पुरस्कार प्रस्ताव ऑनलाइन

केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी आता ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

Maharashtra Times 23 Jul 2016, 12:51 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teacher award proposal online
शिक्षक पुरस्कार प्रस्ताव ऑनलाइन


केंद्र व राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. पुरस्कारासाठी आता ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार २०१५-१६ या वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी येत्या ५ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण संचालकांच्या स्तरावर पात्र शिक्षकांच्या प्रस्तावांची छानणी करण्यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. या निकषांमध्येही आता बदल करण्यात आले असून नव्या निकषांनुसार प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना जिल्हा परिषदांना दिल्या आहेत. प्रस्ताव तपासणीसाठी ऑनलाइन पाठवावे लागणार आहेत. सुधारीत निकषानुसार प्राप्त होणाऱ्या प्रस्तावातून जिल्ह्यातून प्रथम आणि द्वितीय निवड होणाऱ्या शिक्षकांस प्रत्यक्ष मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. मुलाखतीतून शिक्षकांचे विविध प्रकारे मूल्यमापन करण्यात येऊन पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, ५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठवावे लागणार असल्याने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज