अ‍ॅपशहर

गुरुपौर्णिमेलाच गुरूंचा गोंधळ

शिक्षकाने स्वतःच्या अंगावर मारून घेतलेले आसुडाचे फटके, खुर्च्या हातात धरून सुरू असलेली वादावादी, ‘माफी-माफी’च्या घोषणा अशा वातावरणात रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांनी सोसायटीच्या वार्षिक सभेत गोंधळ घातला.

Maharashtra Times 10 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम teachers society meeting
गुरुपौर्णिमेलाच गुरूंचा गोंधळ


पोतराजाचा वेश परिधान करून आलेल्या शिक्षकाने स्वतःच्या अंगावर मारून घेतलेले आसुडाचे फटके, खुर्च्या हातात धरून सुरू असलेली वादावादी, ‘माफी-माफी’च्या घोषणा अशा वातावरणात रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांनी सोसायटीच्या वार्षिक सभेत गोंधळ घातला. माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत याच वातावरणात सभासदांना साडेनऊ टक्के दराने कर्ज देणे तसेच यापुढे ३ वर्षे कोणतीही जागा खरेदी करायची नाही, असे निर्णय घेतले गेले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष सुनील काकडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नंदनवन लॉन्समध्ये ७४ वी वार्षिक सभा झाली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे व विरोधात अन्य असे नेहमीच्या वार्षिक सभेचे चित्र याही सभेत कायम होते.

सोसायटी कामकाजाच्या ऑनलाइनच्या मुद्यावरून सुरुवातीला गोंधळ उडाला. शाब्दीक वादावरून झालेल्या गोंधळानंतर प्रश्नोत्तररूपी शाब्दीक जुगलबंदी रंगली. पोतराजाचा वेष परिधान करून सभागृहात प्रवेश केलेल्या सभासदाने व्यासपीठावर येऊन अंगावर कोरडे ओढून घेत सभागृहाचे लक्ष वेधले. व्यासपीठावर येऊन बोलण्यासाठी माइकची ओढाओढ सुरूच होती. हा गोंधळ वाढल्यानंतर महिला संचालकांनी व्यासपीठ सोडून निघून जाणे पसंत केले. अशा स्थितीत, ‘वार्षिक सभेत उभे राहून संचालकच जर संचालक मंडळाचे वाभाडे काढणार असतील तर त्यांना स्टेजवर बसण्याचा अधिकार नाही’, असे वक्तव्य सत्ताधाऱ्यांकडून झाल्याने त्याचा निषेध सुरू झाला. ‘माफी-माफी’ची घोषणाबाजी झाली. सभेच्या अशा वातावरणातच, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत व दिव्यांग सभासद किंवा त्यांचा पाल्य दिव्यांग असल्यास त्याने भरलेल्या कर्जावरील एकूण व्याज रकमेच्या एक टक्का सवलत देण्याची उपविधी दुरुस्ती आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज