अ‍ॅपशहर

ग्रामसभेतील हाणामाऱ्यानंतर लोणीत तणाव

शिर्डी मतदार संघातील लोणी खुर्द या गावात महाराष्ट्र दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रचंड हाणामारी झाली. ग्रामपंचायत सभागृहाला माजी आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांचे नाव देण्यास सरपंचाच्या नवऱ्याने विरोध केल्याने त्यांना संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. विशेष म्हणजे मारहाणीचा निषेध करण्यासाठी बोलविलेली सभासुद्धा संतप्त ग्रामस्थांनी उधळून लावली. या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून गावात तणाव असून पोलिसांनी गावात तळ ठोकला आहे. दोन्ही बाजूंनी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2018, 10:02 am
ताराचंद म्हस्के,शिर्डी: शिर्डी मतदार संघातील लोणी खुर्द या गावात महाराष्ट्र दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत प्रचंड हाणामारी झाली. ग्रामपंचायत सभागृहाला माजी आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांचे नाव देण्यास सरपंचाच्या नवऱ्याने विरोध केल्याने त्यांना संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. विशेष म्हणजे मारहाणीचा निषेध करण्यासाठी बोलविलेली सभासुद्धा संतप्त ग्रामस्थांनी उधळून लावली. या घटनेमुळे गेल्या दोन दिवसांपासून गावात तणाव असून पोलिसांनी गावात तळ ठोकला आहे. दोन्ही बाजूंनी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tense in loni village
ग्रामसभेतील हाणामाऱ्यानंतर लोणीत तणाव


राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणीबुद्रुक गावाजवळच हे लोणीखुर्दगाव आहे. या गावच्या ग्रामपंचायतीत विखे गटाची सत्ता असून विखे यांच्या जवळच्या नातेवाईक मनिषा हरिभाऊ आहेर या सरपंच आहेत. राजकीय वरदहस्त लाभल्याने सरपंच मनीषा आहेर आणि त्यांचे पती हरिभाऊ आहेर यांचा मनमानी कारभार गावात सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याचाच भडका ग्रामसभेत उडाल्याचं सूत्रांनी सांगितलं. महाराष्ट्र दिनी महादेव मंदिरात विशेष ग्रामसभा भरली होती. त्याला मनिषा आहेर, त्यांचे पती हरिभाऊ आहेर, प्रवरा कारखान्याचे माजी संचालक आणि शांतीनाथ आहेर उर्फ शेटजी, ग्रामसेवक थिगळे, तसेच सत्तारुढ विखे गटाचे पदाधिकारी आणि समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. तर विरोधी गटाचे एकनाथ घोगरे, जनार्धन घोगरे व त्यांचे समर्थक ग्रामस्थ उपस्थित होते. माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे जेष्ठ सहकारी आणि माजी आमदार दिवंगत चंद्रभानदादा घोगरे पाटील यांचे नाव ग्रामपंचायतीच्या सभागृहाला देण्याचा ठराव या ग्रामसभेत मांडला तो एकमताने मंजूर झाला. हरिभाऊ आहेर यांनी घोगरे यांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे एका ग्रामस्थाने हरिभाऊ आहेर यांच्या श्रीमुखात भडकावल्याने भांडण वाढले. यावेळी आहेर यांना ग्रामस्थांनी लाथाबुक्क्यांनी जोरदार चोपले. शांतीनाथ आहेर यांनाही बदडले. या घटनेने वातावरण तंग झाले. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत.

या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी बोलविण्यात आलेली सभाही ग्रामस्थांनी उधळून लावली. त्यामुळे गावातील वातावरण अधिकच तापले. या घटनेचा निषेध म्हणून गावात दुपारपर्यंत बंदही पाळण्यात आला. दोन दिवस उलटल्यानंतरही गावातील वातावरण निवळले नसून गावात पोलिसांचा फौजफाटा अद्यापही तैनात आहे. 'माजी आमदार चंद्रभान दादा घोगरे हे लोणी गावचे आणि प्रवरा परिसराचे दैवत आहेत. त्यांनी प्रवरा शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी जमिनी मिळवून दिल्या. त्यांच्याच पुढाकाराने लोणी खुर्द गावातील मोठी जमीन प्रवरा कन्या शाळा कॅम्पस, प्रवरा मेडिकल ट्रस्टला जमिनी उपलब्ध करून दिल्या हे सध्याचे संस्थाचालक का विसरले ? घोगरे यांच्या नावाला एवढा विरोध का?,' असा सवाल एकनाथ घोगरे यांनी केला आहे. विरोधकांचा विरोध मोडून काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज