अ‍ॅपशहर

थायबॉक्सिंग स्पर्धेस सुरुवात

जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित दहाव्या जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेस नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४१० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. तालुक्यातील खेळाडूही सहभागी झाले आहेत.

Maharashtra Times 15 Aug 2017, 3:00 am
नगर ः जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित दहाव्या जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेस नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत जिल्ह्यातील ४१० खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. तालुक्यातील खेळाडूही सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम thayboxing competition begins
थायबॉक्सिंग स्पर्धेस सुरुवात

शासकीय नोकरीमध्ये खेळाडूंना प्राधान्य दिले जात असून, अनेक खेळाडूंना शासकीय नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. खेळाने शरीर व मन सृदढ बनते. शरिर सक्षम असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्वत:चे शरीर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे. यामधूनच एखादा खेळाडू ऑलिंपिक मध्ये पदक मिळवेल अशी अपेक्षा नगरसेवक बारस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना सातारा येथे होणार्या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमीत पवार, मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप, सचिव दिनेश गवळी, जयसिंग काळे, अमोल काजळे, प्रशिक्षक दत्ता मांडगे, हुसेन पठाण, अशफाक शेख, सागर थोरात, प्रशांत पालवे, वैभव आव्हाड, नवनाथ दारकुंडे, प्रशांत थोरात, अजय पटेकर, नीता शिंदे, मंदा तायडे, राष्ट्रीय खेळाडू गौरी गागरे, युगांशी गवळी, अतुल काजळे, अक्षय चौधरी, शुभम जोशी, धर्मनाथ घोरपडे, आदिनाथ सांगळे उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज