नगरः केडगाव येथे चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला घरमालकाने पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. मासिद मोहम्मद हसन (वय २० रा. संसारपूर, सहानपूर, उत्तरप्रदेश) असे पकडलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध घरात अनाधिकारने प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बुधवारी सकाळी नऊ वाजता केडगावमधील शाहूनगर येथील स्वप्नील बाबूराव इथापे यांचे घर उघडे होते. त्यावेळी चोरटा घरात घुसून कपाटाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करीत होता. कोणीतरी घरात घुसल्याचे इथापे यांच्या लक्षात आले. त्यांनी चोरट्याला पकडले. त्यावेळी चोरटा व इथापे यांच्यामध्ये झटापट झाली. परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला आल्यानंतर चोरट्य़ाला पकडण्यात आले. कोतवाली पोलिस स्टेशनला माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जावून चोरट्याला ताब्यात घेतले आहे.
घरात घुसलेल्या चोराला पकडले
नगरः केडगाव येथे चोरी करण्यासाठी घरात घुसलेल्या चोरट्याला घरमालकाने पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले मासिद मोहम्मद हसन (वय २० रा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Nov 2019, 4:00 am