अ‍ॅपशहर

दोन हजार घरांची पडझड

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार ४२ घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी १ हजार ३३८ घरे नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र ठरली असून नुकसान भरपाई देण्याचे कामही आपत्ती विभागाने सुरू केले आहे.

Maharashtra Times 18 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the collapse of two thousand houses
दोन हजार घरांची पडझड

जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीमुळे दोन हजार ४२ घरांचे नुकसान झाले आहे. यापैकी १ हजार ३३८ घरे नुकसान भरपाई देण्यासाठी पात्र ठरली असून नुकसान भरपाई देण्याचे कामही आपत्ती विभागाने सुरू केले आहे. याशिवाय गेल्या चार महिन्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये चार झोपड्या व २७ गोठ्यांचे सुद्धा नुकसान झाले आहे.
जिल्ह्यामध्ये यंदा सर्वत्रच जोरदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यात पावसाळा सुरू झाल्यापासून, म्हणजेच १ जून २०१७ पासून ते २८ सप्टेंबर २०१७ पर्यंत अतिवृष्टी, वीज पडणे, भिंत कोसळणे, पूर, वादळवारे, ढगफुटी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे २ हजार ४२ घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये संपूर्ण पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची संख्या १०१, कमी प्रमाणात पडझड झालेल्या पक्क्या घरांची संख्या ५६४ व कच्च्या घरांची संख्या १ हजार ३७७ आहे. यामध्ये संपूर्ण पडझड झालेले ८१, कमी प्रमाणात पडझड झालेले पक्क्या ३४० व कच्च्या ९१७ घरांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. याशिवाय पडझड झालेल्या झोपड्यांची संख्या चार असून यासर्व झोपड्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच पावसामुळे २७ गोठ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी २४ गोठ्यांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांचा पंचनामा करून त्यानुसार मदत देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत कमी प्रमाणात पडझड झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांची अनुक्रमे १ लाख ६१ हजार २०० आणि ४ लाख ८३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई दिली आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या गोठ्यांच्या भरपाई पोटी ३३ हजार ६०० रुपये मदत देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज