अ‍ॅपशहर

कोट्यवधींचा ‘बिग मी’ घोटाळा; पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

बिग मी इंडिया कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची सात कोटी ७६ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर येथील सतीश खोडवे यांनी ४ डिसेंबर २०२१ रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे. या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू आहे. पोलिसांनी या आधी बिग मी इंडिया कंपनीचा प्रमुख सोमनाथ राऊत याला अटक केली आहे. तर अन्य आरोपींपैकी सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालायाने फेटाळला आहे.

Authored byविजयसिंह होलम | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2022, 2:09 am
अहमदनगर : अहमदनगरमधील बिग मी इंडिया कंपनीद्वारे आर्थिक गुंतवणूकदारांची सुमारे पावणे आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी नगरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी सोनिया सोमनाथ राऊत, वंदना चंद्रकांत पालवे, प्रितम मधुकर शिंदे व शलमन दावीत गायकवाड या चौघांना अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले पोलिस उपअधीक्षक (गृह) संजय नाईक पाटील व सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री पाचपुते यांच्यासह पोलिस पथकाने ही कामगिरी केली. (police has taken major action in the multi crore big me scam case)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम the financial crime branch of the police has taken major action in the multi crore big me scam case
कोट्यवधींचा ‘बिग मी’ घोटाळा; पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

बिग मी इंडिया कंपनीद्वारे गुंतवणूकदारांची सात कोटी ७६ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर येथील सतीश खोडवे यांनी ४ डिसेंबर २०२१ रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली आहे. या आर्थिक गुन्ह्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू आहे. पोलिसांनी या आधी बिग मी इंडिया कंपनीचा प्रमुख सोमनाथ राऊत याला अटक केली आहे. तर अन्य आरोपींपैकी सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज यापूर्वी जिल्हा न्यायालायाने फेटाळला आहे.

क्लिक करा आणि वाचा- 'त्यांनी एक अब्दुल सत्तार नेला, आम्ही मरेपर्यंत...'; मुस्लीम शिवसैनिक संतापला

त्यानंतर यातील आरोपी संचालक सोनिया सोमनाथ राऊत हिने उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता, पण तोही फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करीत सोनिया राऊतसह वंदना पालवे,प्रितम शिंदे व शलमन गायकवाड या चौघांना अटक केली.

क्लिक करा आणि वाचा- मंत्री गडाखांनाही फोन आले, पण बधले नाहीत; सहयोगींमधील शिवसेनेसोबत उरले एकटेच

या आर्थिक गुन्ह्यासंदर्भात ६७ गुंतवणूकदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. यातून कंपनीसमवेत झालेले त्यांचे करार, गुंतवणूक रकमेची पावती, धनादेश, गुंतवणूक केलेल्या रकमांचे बँक स्टेटमेंट,बिग मी इंडिया कंपनीने केलेल्या जाहिराती, जाहीर केलेले बिझनेस प्लॅन आदींसह वापरण्यात आलेले मोबाईल व मोबाईल नंबर, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, कॉल रेकॉर्डिंग,व्हिडिओ रेकॉर्डिंग वृत्तपत्रांतून केलेल्या जाहिराती, गुंतवणूकदारांना जास्त गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या लेटर हेडवर दिलेले पत्र,गुंतवणुकीवरील परताव्याचे आमीष अशा पुराव्यांचा यात समावेश आहे.

क्लिक करा आणि वाचा- 'यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा'; भाजप खासदाराचे सूचक वक्तव्य
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख