नगर : बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल नगर शहरामध्ये प्रहार संघटनेने फटाके फोडत व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अचलपूर मतदारसंघातून बच्चू कडू यांनी आपला विजय साकारला आहे. प्रहार संघटनेने या विजयाचा ठिकठिकाणी जल्लोष केला. नगरमध्येही प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बच्चू कडू यांचा विजय निश्चित होताच जल्लोषाला सुरूवात करण्यात आली. कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड रोडवर बोल्हेगाव फाट्याजवळ फटाके फोडले. त्यानंतर गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी संघटनेचे अजय महाराज बारस्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रहार संघटनेचा नगरमध्ये जल्लोष
बच्चू कडू चौथ्यांदा विधानसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल नगर शहरामध्ये प्रहार संघटनेने फटाके फोडत व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2019, 4:00 am