नगर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी सुजाता आसाराम साळवे (वय ४९) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ. सुजाता साळवे महापालिकेच्या तोफखाना आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. गुलमोहोर रोड येथील कोहिनूर मंगल कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या आसरा हौसिंग सोसायटीत असलेल्या त्यांच्या राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. साळवे यांच्या आत्महत्यामागचे कारण समजू शकले नाही. त्या आपल्या पतीपासून विभक्त राहत होत्या, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.
पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी सुजाता आसाराम साळवे (वय ४९) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2019, 4:00 am