अ‍ॅपशहर

धान्य चोरीला बसणार चाप

गोदामापासून ते रेशनदुकानदारापर्यंत धान्याचा पुरवठा करताना धान्याची तूट होते. तसेच, काही वेळेस वाहतूक करणाऱ्यांकडून धान्याची चोरी केली जाते.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम theft of grain
धान्य चोरीला बसणार चाप


गोदामापासून ते रेशनदुकानदारापर्यंत धान्याचा पुरवठा करताना धान्याची तूट होते. तसेच, काही वेळेस वाहतूक करणाऱ्यांकडून धान्याची चोरी केली जाते. या धान्याची तूट भरून काढण्यासाठी निश्चित असे वसुलीचे दर नसल्याने वाहतूक करणारे तुटीपोटी कमी रक्कम भरून धान्याची लूट करत होते. आता मात्र पुरवठा विभागाने तुटीच्या वसुलीबाबत नियम ठरवून दिला आहे. नवीन नियमानुसार वाहतूकदाराकडून धान्याची तूट झाल्यास त्याच्याकडून घाऊक बाजारभावाच्या दरानुसार वसुली केली जाणार आहे. त्यामुळे धान्य चोरी करणाऱ्याला वाहतूक करणाऱ्या कंत्राटदाराला चाप बसणार आहे.

अन्नसुरक्षा योजनेतून रेशनकार्डवरील लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून दोन रुपये किलोने गव्हू व तीन रुपये किलोने तांदूळ दिले जाते. कंत्राटी वाहतूकदाराकडून हे धान्य गोदामामधून थेट रेशनदुकानदाराकडे पुरविले जाते. ही वाहतूक करताना वाहतूकदाराकडून धान्याची तूट दाखविली जाते. किती तूट असावी, तुटीपोटी किती रक्कम वसुली करावी, याबाबत निकष नव्हता. झालेली ही तूट वाहतूकदाराच्या बिलामधून प्रशासन वसूल करत होते. प्रत्यक्षात रेशनवरील धान्याची किमतीपेक्षा जास्त किमतीने धान्य तुटीची वाहतूकदाराकडून वसुली होत होती. त्यामुळे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकून वाहतूकदार हे पैसे कमवत होते. तुटीबाबत निकषच नसल्याने सांगून पुरवठा विभागाचे अधिकाऱ्याचे याकडे हेतुपरस्पर दुर्लक्षच करत होते.

अन्नसुरक्षा योजना लागू झाल्यापासून धान्य तुटीचा हा प्रकार घडत होता. धान्य वाहतूक होणाऱ्या वाहनातून पोतीच्या पोती धान्य गायब होते. परंतु, आता याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने तूट वसुलीबाबत दरच निश्चित केला आहे. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये धान्य गोदामामधून थेट रेशनदुकानदारांना धान्य पुरवठा केला होता. नगर जिल्ह्यात याच पद्धतीने धान्याचा पुरवठा केला जातो. धान्य तुटीची वसुली करताना वाहतूक कंत्राटदाराला सवलत देण्यात आली आहे. एका टनामागे अर्धा किलो तूट माफ केली जाणार आहे. त्यापुढील तुटीची वसुली स्थानिक घाऊक बाजारभावाने केली जाणार आहे. या नियमामुळे आता धान्य वाहतूक करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्याबाजारत धान्य विक्रीस चाप बसणार आहे. हा तुटीबाबतचा निकष मंगळवारपासून लागू करण्यात आले आहे.

कमिशन वाढविले

रेशनदुकानदारांचे साखर विक्रीचे कमिशन पुरवठा विभागाने नुकतेच वाढविले आहे. पूर्वी एक क्विंटल साखर विक्री केल्यानंतर दुकानदाराला ६ रुपये ३६ पैसे कमिशन मिळत होते. आता हे कमिशन वाढून क्विंटलमागे ७० रुपये करण्यात आले. कमिशन वाढविले असले तरी लाभार्थ्यांना मात्र महाग साखर घ्यावी लागणार आहे. १३ रुपये ५० पैसे किलोने साखर विकली जात होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज