अ‍ॅपशहर

सहा हजार अंगणवाडी सेविकांचे आधार लिंक नाही

राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पीएफएमएस या प्रणालीद्वारे मानधन जमा केले जात असले तरी तब्बल ६ हजार २२२ अंगणवाडी सेविकांचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्याने या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.

Maharashtra Times 28 Feb 2018, 2:42 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम there is no support link for six thousand anganwadi sevikas
सहा हजार अंगणवाडी सेविकांचे आधार लिंक नाही


राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यास सुरुवात झाली आहे. पीएफएमएस या प्रणालीद्वारे मानधन जमा केले जात असले तरी तब्बल ६ हजार २२२ अंगणवाडी सेविकांचे आधार बँक खात्याशी लिंक नसल्याने या कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत.

अंगणवाडी सेविकांचे पगार ऑनलाइन करण्यासाठी त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक केले जात आहे. या कामात प्रशासनास अडचणी येत आहेत. बऱ्याच अंगणवाडी सेविकांचे खाते दुसऱ्या बँकेत आहे, तसेच या खात्यांना आधार लिंक आहेत. काही खात्यांचे आधार लिंकींग बाकी आहे. त्यामुळे बऱ्याचदा पैसे असतानाही पगार जमा करता येत नाहीत. राज्यातील जवळपास ६ हजार २२२ कर्मचाऱ्यांचे आधार लिंक नसल्याची उघड झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी व पुढील मार्च महिन्याचे पगार ऑफलाइन करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

आधार लिंकींगसाठी विशेष मोहिम

राज्यातील ज्या अंगणवाडी सेविकांचे आधार नंबर त्यांच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्याशी लिंक झाले नाही, त्याची माहिती घेऊन आधार लिंक करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत. आधार लिंक झाल्यानंतर मात्र एप्रिल २०१८ पासून पगार ऑनलाइनच जमा होतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज