अ‍ॅपशहर

पोलिसांसाठी ‘टॉयलेट व्हॅन’

बंदोबस्ताच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्यास पोलिस कर्मचाऱ्यांची कुंचबणा होते. त्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागते. बंदोबस्ताच्या वेळी गर्दी असल्याने दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. त्यावर उपाय म्हणून सुसज्ज अशी पोलिस टॉयलेट व्हॅन तयार करण्यात आली आहे.

Maharashtra Times 15 Dec 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम toilet van for police
पोलिसांसाठी ‘टॉयलेट व्हॅन’

बंदोबस्ताच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नसल्यास पोलिस कर्मचाऱ्यांची कुंचबणा होते. त्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांना मोठी अडचण सहन करावी लागते. बंदोबस्ताच्या वेळी गर्दी असल्याने दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. त्यावर उपाय म्हणून सुसज्ज अशी पोलिस टॉयलेट व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन बंदोबस्ताच्या ठिकाणी फिरती असणार आहे. महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

शिर्डी, शनिशिंगणापूर येथे पोलिसांचा नियमित बंदोबस्त असतो. या ठिकाणी शौचालये असली तरी तेथे भाविकांमुळे गर्दी होते. त्यामुळे ते पोलिसांना वापरण्यासाठी मिळत नाही. ग्रामीण भागात यात्रा, उत्सव काळात बंदोबस्त असतो. नेत्यांच्या सभेसाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. परंतु सभेजवळ शौचालयाची कोणतीही व्यवस्था केलेली नसते. ग्रामीण भागातील पोलिस स्टेशनला कमी महिला कर्मचारी असल्याने मुख्यालयातून पोलिस बंदोबस्त पुरावला जातो. जिल्हा क्षेत्रफळाने मोठा असल्याने लांबपर्यंत प्रवास या कर्मचाऱ्यांना करावा लागतो. त्यात दिवसभर पोलिस बंदोबस्त असला तरी पोलिस कर्मचाऱ्यांना मात्र शौचालयाची व्यवस्था नसते. त्यावर उपाय म्हणून पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या संकल्पनेतून एक टॉयलेट व्हॅन तयार करण्यात आली आहे.

पोलिस व्हॅनचा उपयोग करून पुणे येथूनच ही टॉयलेट व्हॅन तयार करून घेण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये पुरुष कर्मचारी व महिला पोलिस कर्मचारी यांच्यासाठी सहा फायबरचे टॉयलेट तयार करण्यात आले असून, एक वॉशबेसिन तयार करण्यात आले आहे. व्हॅनमध्ये एकहजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविण्यात आली आहे. शौचालय स्वच्छ राहण्यासाठी एक स्वच्छता कर्मचारीही कायमस्वरुपी या व्हॅनबरोबर असणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज