अ‍ॅपशहर

गोमांस घेऊन जाणारे वाहन उलटले आणि संपूर्ण रस्त्यावर...

पुणे-नाशिक महामार्गावर डोळसणे शिवारात मांस वाहून नेणाऱ्या एका पिकअप व्हॅनला आज अपघात झाला. या अपघातामुळं महमार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. अपघातानंतर वाहनचालक फरार झाले.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2021, 2:50 pm
अहमदनगर: संगमनेरहून मुंबईकडे अवैधरित्या गोमांस घेऊन जाणाऱ्या पीकअपला पुणे-नाशिक महामार्गावर डोळसणे शिवारात अपघात झाला. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप व्हॅन महामार्गावर पलटी होऊन त्यातील जनावरांचे मांस महामार्गावर विखुरले गेले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अहमदनगर


या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास दीड ते दोन तास ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली असून महामार्गावर विखुरलेल्या जनावरांच्या मांस पीकपसह बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. वाहन चालकासह इतर फरार झाले.

वाचा: 'शिवसेनेच्या नेत्यांना मन मोकळं करायची संधी दिली तर...'

संगमनेरहून मुंबईकडे पिकअपमधून (एमएच ४७ ई २७६०) दोन टन गोमांस वाहून नेले जात होते. या वाहनाला डोळसणे शिवारातील बाबलेवाडी जवळ सकाळी आठ वाजता अपघात झाला. याप्रकरणी चालक घटनास्थळावरून फरार झाला असून घारगाव पोलीस वाहनाच्या मालकाचा शोध घेत आहे. घारगाव पोल‌िस स्थानकात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.

मराठा आरक्षण: कोर्टाचा निकाल येताच काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज