अ‍ॅपशहर

इंदिरा गांधी हत्याकांडाशी 'कोपर्डी'ची तुलना

मानवतेला काळीमा फासणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्याची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हत्याकांड आणि दहशतवादी अफजल गुरूच्या खटल्याशी तुलना करण्यात आली. इंदिरा गांधी हत्याकांडात कट रचल्याच्या आरोपावरून केहर सिंह या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोपर्डी खटल्यातही आरोपींनी कट रचून हे हत्याकांड घडवून आणले आहे. क्रुरपणे हे हत्याकांड करण्यात आल्याने 'रेअरेस्ट ऑफ रेअर केस' म्हणून या खटल्याकडे पाहून आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

Maharashtra Times 22 Nov 2017, 2:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ujjwal nikam on kopardi case
इंदिरा गांधी हत्याकांडाशी 'कोपर्डी'ची तुलना


मानवतेला काळीमा फासणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्याची माजी पंतप्रधान इंदिरा गांधी हत्याकांड आणि दहशतवादी अफजल गुरूच्या खटल्याशी तुलना करण्यात आली. इंदिरा गांधी हत्याकांडात कट रचल्याच्या आरोपावरून केहर सिंह या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. कोपर्डी खटल्यातही आरोपींनी कट रचून हे हत्याकांड घडवून आणले आहे. क्रुरपणे हे हत्याकांड करण्यात आल्याने 'रेअरेस्ट ऑफ रेअर केस' म्हणून या खटल्याकडे पाहून आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला.

कोपर्डी खटल्याच्या अंतिम सुनावणीवर आज जिल्हा व सत्र न्यायालयात बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे आणि सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. निकम यांनी बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांचे मुद्दे खोडून काढताना या खटल्याची तुलना थेट इंदिरा गांधी हत्याकांडाशी केली. इंदिरा गांधी हत्याकांडात आधी दोघा आरोपींना पकडण्यात आले होते. नंतर केहर सिंहला अटक करण्यात आली. त्यावेळी केहर सिंहच्याविरोधात पुरावे नसल्याचे सांगत त्याच्या साधेपणाचे दाखलेही देण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हे आरोप फेटाळून लावत परिस्थितीजन्य पुराव्यावरून केहर सिंहला फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्यावर हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कोपर्डी खटल्यातही आरोपी संतोष भवाळने बलात्कार केला नसल्याचं सांगण्यात येतं. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी पुरावे नसल्याचंही सांगण्यात येतं. पण परिस्थितीजन्य पुरावे भक्कम आहेत. शिवाय भवाळने कट रचल्याचंही सिद्ध झालं आहे. त्यामुळे इंदिरा गांधी हत्याकांडाचा कट रचल्याच्या आरोपावरून केहर सिंहला फाशी होते, तर कोपर्डी खटल्यातही कटाचाच आरोप असलेल्या आरोपींना फाशी का देऊ नये?. असा सवाल उज्जवल निकम यांनी केला. यावेळी निकम यांनी बच्चन सिंग विरूद्ध पंजाब, मच्छि सिंग विरूद्ध पंजाब आणि धनंजय चक्रवर्ती विरूद्ध पश्चिम बंगाल या काही खटल्यांचेही दाखले दिले. संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी अफजल गुरू यानेही कट रचूनच हल्ला केला होता. त्यामुळे त्याला फाशी सुनावण्यात आली होती, असं सांगत कट रचण्याच्या अनेक गुन्ह्यात आरोपींना फाशी देण्यात आल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं.

फाशी का व्हावी? १३ कारणे

यावेळी निकम यांनी आरोपींना फाशी का व्हावी हे पटवून देण्यासाठी १३ कारणं दिली. हा नेहमीसारखा खून नाही. हे क्रुर कृत्य आहे. म्हणूनच ही 'रेअरेस्ट ऑफ रेअर केस' आहे. ही 'कोल्ड मर्डर'ही नाही तर 'फ्रोजन मर्डर' आहे, अशी विविध १३ कारणे देतानाच भवाळ आणि नितीन भैमूले या दोघांनी बलात्कार केला नसला तरी त्यांनी कट रचला आहे. त्यामुळे हे हत्याकांड आणि बलात्कार प्रकरण घडलं. हे आरोपी सुधारण्याच्या पलिकडचे आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नये म्हणून त्यांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे. जेणेकरून समाजात दबाव निर्माण होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे तिन्ही आरोपी मनोरुग्ण नव्हते. ते प्रौढ होते. त्यांना कृत्याची जाणीव होती. शिवाय या तिन्ही आरोपींना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप झालाय असंही दिसत नाही, त्यामुळे त्यांना दयामाया दाखविता कामा नये, असा युक्तिवाद निकम यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज