अ‍ॅपशहर

उज्ज्वल निकम 'कोपर्डीत' बचावाचे साक्षीदार

कोपर्डी खटल्यात न्यायालयाकडून आरोपीचे जबाब नोंदविण्यात येत असून, एका आरोपीच्या वतीने बचावाचे साक्षीदार म्हणून सहा जणांची यादी देण्यात आली आहे. या खटल्यात सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील अॅड. उज्जल निकम यांच्यासह पत्रकार, डॉक्टर, जिल्हाधिकारी यांचे नावे अर्जात आहेत. या साक्षीदारांच्या यादीवर सरकारी पक्षाचे वकील अॅड. निकम यांना म्हणणे मांडावे, अशा सूचना न्यायालयाने दिल्या आहेत.

Maharashtra Times 23 Jun 2017, 1:11 am
म.टा. प्रतिनिधी। अहमदनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ujwal nikam as a witness for defence in kopardi case
उज्ज्वल निकम 'कोपर्डीत' बचावाचे साक्षीदार


कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून सहा जणांची यादी आरोपीच्या वतीने गुरुवारी न्यायालयात सादर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यादीत या खटल्यात सरकारी पक्षाचे बाजू मांडत असलेले सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांचे नाव आहे. यावर सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. निकम शुक्रवारी म्हणणे मांडणार आहे. त्यानंतर या यादीवर न्यायालय निर्णय देणार आहे

या खटल्याची अंतिम सुनावणी सुरू असून, या गुन्ह्यातील आरोपींचे न्यायालय जबाब नोंदवून घेत आहे. गुरुवारी आरोपी संतोष भवाळ याचा जबाब नोंदविण्यात आला. त्यात बचावाचे साक्षीदार घ्यायचे असल्याची माहिती आरोपीने न्यायालयात दिली. त्यानुसार भवाळ याचे वकील अॅड. बाळासाहेब खोपडे यांनी अर्जासह बचाव पक्षाच्या वतीने साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली. या अर्जाबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण असलेली एक सीडीही दाखल करण्यात आली असून, विशेष सरकारी वकील अॅड. निकम यांच्यासह रवींद्र चव्हाण, वैद्यकीय अधिकारी राजाभाऊ थोरात, एका वृत्तवाहिनीचा संपादक, नगरचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांची नावे आहेत. निकम यांची या खटल्यात नेमणूक कशी झाली आहे, मंत्रालयात झालेल्या पत्रव्यवहारासंदर्भात माहिती घ्यायची आहे. त्यामुळे त्यांचे नाव साक्षीदाराच्या यादीत घेतले असल्याचे अॅड. खोपडे यांनी अर्जात म्हटले आहे. दरम्यान अॅड. उज्ज्वल निकम हे सकाळी न्यायालयात हजर होते. त्यानंतर वैयक्तिक कारणामुळे न्यायालयातून ते निघून गेले. आज, शुक्रवारी न्यायालयात हजर राहणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज