अ‍ॅपशहर

नवजीवन प्रतिष्ठानला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, नाशिक विभागात दुसरा क्रमांक

राज्यात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा राज्य सरकारकडून सन्मान करण्यात येतो. दरवर्षी महसुल व वनविभाग यांच्या वतीने पुरस्कार दिला जातो.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2022, 6:08 pm
मुंबई : राज्यातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन यामधे उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना सन्मानीत करण्यासाठी दरवर्षी महसुल व वनविभाग यांचेवतीने हा पुरस्कार दिला जातो. नवजीवनला २०१९ या वर्षीचा नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तीस हजार रूपये, स्मृतीचिन्ह, व प्रशिस्तपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tree plantation and preservation news
नवजीवन प्रतिष्ठानला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, नाशिक विभागात दुसरा क्रमांक


नवजीवन प्रतिष्ठानच्या वतीने कामिन्स इंडिया फौंडेशन आणि नाबार्ड बँकेच्या आर्थीक सहकार्याने देवगाव ता.जि. अहमदनगर येथे वातावरणातील बदलावर आधारीत एकात्मीक पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा, गायराण एरिया, वनक्षेत्र आणि शेतकयांच्या वयक्तिक शेतामधे सुमारे वीस हजार दुर्मीळ व औषधी झाडे लावली. त्याद्वारे निसर्ग संवर्धनाचे पथदर्शी कार्य सुरू आहे. त्या कामासाठी संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे.

नवजीवनच्या वतीने अहमदनगर, बीड, हिंगोली, पुणे, ठाणे या जिल्हयात ग्रामीण विकास व पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले जात असुन भविष्य काळात नगर तालुक्यातील प्रत्येक गावातील शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय कार्यालये येथे घनवन प्रकल्प, देवराई निर्माण व मियाँवाँकी फॉरेस्टची निर्मिती करुन याद्वारे निसर्ग संवर्धनाचे कार्य करण्याचा संस्थेने संकल्प केला आहे अशी माहिती संस्थेचे विश्वस्त संजय आढाव व राजेंद्र पवार यांनी दिली, या कार्यासाठी संगीता पवार, अमित गायकवाड, जयेश कांबळे व दत्तात्रय गायकवाड कार्यरत आहेत.

महत्वाचे लेख