अ‍ॅपशहर

aaditya thackeray:आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांचे काम चांगले आहे; आघाडीतील 'या' मंत्र्यांकडून कौतुक

'आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते एक सक्षम नेता आहेत. एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल त्याची काम करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Aug 2020, 5:40 pm
म.टा. प्रतिनिधी, नगर: 'आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते एक सक्षम नेता आहेत. एखादी व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल त्याची काम करण्याची जिद्द असणे महत्वाचे आहे. आदित्य यांच्यामध्ये ही जिद्द असून त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगले काम केले जाईल,' असे मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगतानाच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीवर झालेल्या अध्यक्षपदी निवडीचे समर्थन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aaditya thackeray


'करोना काळात आंदोलनं करताना विरोधकांना लाजा कशा वाटत नाहीत?'

आज औरंगाबाद येथून मुंबईला जात असताना गायकवाड या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी काही काळ नगरच्या शासकीय विश्रामगृहावर थांबल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला . याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष दिप चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी गायकवाड यांना आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्कार शिफारस समितीवर झालेल्या निवडीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या , 'आदित्य ठाकरे हे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते सक्षम आहेत, आणि सक्षम आसणारी व्यक्ती ही चांगल्या पद्धतीने काम करत असते. मग ती व्यक्ती युवा असेल किंवा अनुभवी असेल , त्यामध्ये काम करण्याची जिद्द महत्त्वाची आहे, व ही जिद्द आदित्य ठाकरे यांच्यामध्ये दिसते.

सुशांतप्रकरणाशी आदित्य यांचा संबंध नाही, मग राऊत का प्रतिक्रिया देतात?: राणे

दरम्यान, यावेळी सुशांतसिंह राजपूत प्रकरणाबाबत गायकवाड यांना विचारले असता, त्या म्हणाल्या 'खरंतर मला तुम्ही शिक्षणाचे प्रश्न विचारायला पाहिजे, पण आता तुम्ही विचारताच आहात तर मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड पोलिसांसोबत होते, आणि त्याच मुंबई पोलिसांकडून याचा तपास चालू आहे, ते सत्यता बाहेर आणतील,' असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज