अ‍ॅपशहर

‘वेध परिषदे’मध्ये कर्तृत्ववानांची गाथा

वेध प्रबोधन परिषदेचे. शनिवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता येथील माऊली सभागृहात हा उपक्रम होणार आहे.

Maharashtra Times 18 Nov 2016, 3:00 am
नगर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vedh prabodhan program
‘वेध परिषदे’मध्ये कर्तृत्ववानांची गाथा


आदिवासींच्या विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या डॉ. राणी बंग, पोलिस अधिकारी असतानाही ग्रामसुधारणा व जलसंधारण विकासाला प्रोत्साहन देणारे महेश भागवत, पत्रकारितेत परिवर्तनवादी लेखन करणारे विनोद शिरसाठ, तसेच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील ‘आशू’ म्हणजेच पुष्कराज चिरपुटकर व राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धावपटू अंजना ठमके या कर्तृत्ववानांची यशोगाथा नगरमध्ये उलगडणार आहे. निमित्त आहे, वेध प्रबोधन परिषदेचे. शनिवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी साडेदहा वाजता येथील माऊली सभागृहात हा उपक्रम होणार आहे.

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीसह या शाळेत १९६७मध्ये शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहबंध-६७ या संस्थांच्या पुढाकाराने मागील काही १० वर्षांपासून नगरमध्ये ‘वेध व्यवसाय प्रबोधन परिषद-प्रयत्न आणि प्राविण्य’ उपक्रम राबविला जातो. नवलमल फिरोदिया यांच्या स्मृतिनिमित्तच्या या उपक्रमात राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या प्रकट मुलाखतींतून त्यांची यथोगाथा मांडली जाते. यंदाच्या वेध परिषदेतील कर्तृत्ववानांशी स्नेहबंध-६७च्या सदस्य सुनंदा अमरापूरकर व मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी संवाद साधणार आहेत. शहरातील विविध शाळांतील पालक व विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज