अ‍ॅपशहर

‘जनता भाजपच्या स्वप्नरंजनातच’

‘दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्यातील भाजप स्थित्यंतरावेळच्या स्वप्नरंजनातून जनता अजूनही बाहेर पडायला तयार नाही’, असा उद्वेग विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज व्यक्त केला.

Maharashtra Times 24 Feb 2017, 3:00 am
नगर : ‘दोन-सव्वादोन वर्षांपूर्वी केंद्र व राज्यातील भाजप स्थित्यंतरावेळच्या स्वप्नरंजनातून जनता अजूनही बाहेर पडायला तयार नाही’, असा उद्वेग विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आज व्यक्त केला. ‘नोटाबंदीने अर्थव्यवस्था उदध्वस्त झाली, शेतमालाला भाव नाही, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, पण मतदारांवर याचा परिणाम झाला नाही’, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम vikhe comment on results
‘जनता भाजपच्या स्वप्नरंजनातच’


राज्यातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक निकालावर विखे म्हणाले, ‘काँग्रेसला हवे तेवढे यश मिळाले नाही, पण जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. काँग्रेसच्या पिछेहाटीवर पक्षांतर्गत विचारमंथन नक्कीच होणार आहे. एकमेकांवरील दोषारोपांची जाहीर वाच्यता काही नेत्यांनी केली होती, पण आता निकालातून शहाणपण शिकावे व जाहीर वाच्यता टाळली जावी’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज