अ‍ॅपशहर

ग्रामस्थांकडून अॅड. निकम यांचा सत्कार

​ नगर : न्यायालयाने कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्याने आता आरोपींना फाशीची शिक्षा होती का?, याची प्रतीक्षा कोपर्डीकरांना लागली आहे. खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डी येथील ग्रामस्थ जिल्हा न्यायालयात आले होते. आरोपींना दोषी ठरवल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयातून शासकीय विश्रामगृह येथे जाऊन विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांचे आभार मानल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.

Maharashtra Times 19 Nov 2017, 3:00 am
नगर : न्यायालयाने कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना दोषी ठरवल्याने आता आरोपींना फाशीची शिक्षा होती का?, याची प्रतीक्षा कोपर्डीकरांना लागली आहे. खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डी येथील ग्रामस्थ जिल्हा न्यायालयात आले होते. आरोपींना दोषी ठरवल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. न्यायालयातून शासकीय विश्रामगृह येथे जाऊन विशेष सरकारी वकील अॅड.उज्ज्वल निकम यांचे आभार मानल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम villagers felicitated advocate nikam
ग्रामस्थांकडून अॅड. निकम यांचा सत्कार

‘कोपर्डीच्या घटनेनंतर संपूर्ण समाज एकत्र आला. शांततेच्या मार्गाने समाजाने लढा दिला. आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास असून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी धरले आहे. त्यामुळे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे आभारी असून आता आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल,’ अशी अपेक्षा असल्याचे ग्रामस्थ तात्या सुद्रीक यांनी सांगितले. ‘घटनेनंतर आमच्या गावामध्ये गेल्या वर्षभरात कोणताही सण साजरा करण्यात आला नव्हता,’ असे सरपंच रोहिणी सुद्रीक यांनी सांगितले. ‘आरोपींना दोषी धरले असले तरी आम्हाला आता त्यांना होणाऱ्या शिक्षेची प्रतीक्षा आहे. भविष्यात कोणत्याही मुलीवर अत्याचार होऊ नये, यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी,’ असेही त्यांनी सांगितले. तर, जेव्हा आरोपींना फाशीची शिक्षा होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, असे शितल सुद्रीक यांनी सांगितले.
‘न्यायालयात आल्यानंतर मला अश्रू अनावर झाले होते,’ असे पीडित मुलीचे काका (चुलते) म्हणाले. ‘आता आरोपींना फाशी होते का, याची प्रतीक्षा आहे. भविष्यात कोणत्याही मुलीवर अत्याचार होऊ नये, यासाठी सरकारने उपाय योजना करण्याची गरज असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज