अ‍ॅपशहर

बीएसएनएलच्या मोडेमवर 'व्हायरस'

बीएसएनएलच्या ब्रॉडबँडच्या मोडेमवर व्हायरस हल्ला झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून घरगुती, सरकारी कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. याबाबत बीएसएनएलकडे तक्रारी येत आहेत. जिल्ह्याधिकारी कार्यालयातील इंटरनेट सेवाही ठप्प झाली असल्याने कामकाज होऊ शकले नाही.

Maharashtra Times 29 Jul 2017, 2:34 am
म.टा.प्रतिनिधी,नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virus attack on bsnl broadband modem
बीएसएनएलच्या मोडेमवर 'व्हायरस'


बीएसएनएलच्या ब्रॉडबँडच्या मोडेमवर व्हायरस हल्ला झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून घरगुती, सरकारी कार्यालयातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. याबाबत बीएसएनएलकडे तक्रारी येत आहेत. जिल्ह्याधिकारी कार्यालयातील इंटरनेट सेवाही ठप्प झाली असल्याने कामकाज होऊ शकले नाही.

मोडेम सुरू असल्याचे दिसते, पण कम्प्युटरवर इंटरनेट कनेक्शन मिळत नाही. ग्राहकांनी बीएसएनएलकडे तक्रारी केल्यानंतर मालवेअर व्हायरस अटॅक झाल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारपासून अशा तक्रारी बीएसएनएलकडे येत असून, गेल्या दोन दिवसांत तीनशेपेक्षा जास्त तक्रारी यासंदर्भात आल्या आहेत. मोडेम रिसेट केल्यानंतर पुन्हा पासवर्ड देऊन मोडेम सुरू करण्यात येत आहेत. तर काही मोडेम हे रिसेट होत नसल्याने ग्राहकांना नवे मोडेम घ्यावे लागणार आहेत. सिरमा, सुपरनेट, आयबॉल बिटा या कंपनीचे मोडेम बीएसएनएलने खरेदी केले होते. त्यावर व्हायरस अटॅक झाला आहे. घरगुती ग्राहकाबरोबर खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयातील इंटरनेट सेवा ही ठप्प झालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक विभागाचे इंटरनेट बंद होते. बीएसएनएलच्या ब्रॉडबँड मोडेमवर व्हायरस हल्ला झाला असून, इंटरनेट सेवा सुरू होत नाहीत. आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त तक्रारी आल्या आहेत. कर्मचारी पाठवून सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपमंडळ अभियंता व्ही. एच. वाघ यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज