अ‍ॅपशहर

अण्णांशी चर्चेसाठी मंत्री महाजन आज राळेगणला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नियोजित उपोषणाची तारीख जवळ येताच पुन्हा सरकारची धावपळ सुरू झाली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. गिरीश महाजन शुक्रवारी (१४ सप्टेंबर) राळेगणसिद्धीला येऊन सरकारच्या वतीने अण्णांशी चर्चा करणार आहेत.

Maharashtra Times 14 Sep 2018, 2:43 am
नगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नियोजित उपोषणाची तारीख जवळ येताच पुन्हा सरकारची धावपळ सुरू झाली आहे. राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. गिरीश महाजन शुक्रवारी (१४ सप्टेंबर) राळेगणसिद्धीला येऊन सरकारच्या वतीने अण्णांशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water resources minister girish mahajan to meet anna hazare today
अण्णांशी चर्चेसाठी मंत्री महाजन आज राळेगणला


हजारे यांच्या मागील आंदोलनाच्या वेळीही महाजन यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली होती. दिल्लीत आंदोलन होण्यापूर्वीच त्यांनी आरोग्य विभागातर्फे राळेगणसिद्धीत महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यातून अण्णांशी संपर्क वाढला आणि पुढे दिल्लीतील आंदोलन संपेपर्यंत ते सरकार आणि अण्णांशी मध्यस्थी करीत होते. दिल्लीतील आंदोलनांनंतरही मागण्या मान्य न झाल्याने दोन ऑक्टोबरपासून हजारे यांनी राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ही तारीख जवळ आल्याने आता सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. दिल्लीतील आंदोलन मागे घेताना हजारे यांना दिलेले आश्वासन आणि त्यानुसार मधल्या काळात सरकारने घेतलेले निर्णय यांची माहिती देऊन अण्णांना उपोषणापासून परावृत्त करण्याचा महाजन यांचा प्रय़त्न असणार आहे. अलीकडेच लोकपाल नियुक्तीसंबंधी सुरू झालेल्या हालचाली, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव यासंबंधी जे निर्णय झाले आहेत, त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज