अ‍ॅपशहर

VIDEO : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात वेगळाच राडा; महिला-मुली नाचू लागताच गौतमी अचानक खाली आली अन्...

Gautami Patil : स्टेजवरून खाली उतरताच गौतमी पाटीलने चंद्रा गाण्यावर ठेका धरला. बराच काळ महिलांसोबत हे नृत्य सुरू होते आणि अन्य प्रेक्षक पाहात होते. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्तासह खाजगी सुरक्षारक्षकांचेही नियोजन केले होते.

Authored byविजयसिंह होलम | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 May 2023, 11:44 am
अहमदनगर : रिल स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्र ठरलेलेच आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम मध्येच बंद करण्याची वेळही येते. तिच्या नृत्यापेक्षा सध्या या राड्याचीच चर्चा अधिक असते. संगमनेर तालुक्यातील तिच्या कार्यक्रमातही ‘राडा’ झाला. तो म्हणजे तरुणांचा गोंधळ नव्हे तर कार्यक्रमास आलेल्या शाळकरी मुली आणि महिलांच्या बेफाम नृत्याचा. महिलांचा हा प्रतिसाद पाहून गौतमीही स्टेजवरून खाली येत या ‘राड्यात’ सभाहभागी झाली. कोणताही व्यत्यय न येता रंगलेल्या या कार्यक्रमाचीही आता चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gautami patil nagar dance
गौतमी पाटील डान्स


संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सास्कृतिक मोहोत्सव निमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. म्हसवंडी म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले गाव. या कार्यक्रमासाठी महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमात संपूर्ण गावाने सहभाग घेत गौतमीला दाद दिली. विशेषत: महिला वर्गाचा प्रतिसाद पाहून गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली. तेथे शाळकरी मुली आणि ज्येष्ठ महिलाही तिच्यासोबत नाचल्या.



स्टेजवरून खाली उतरताच गौतमीने चंद्रा गाण्यावर ठेका धरला. बराच काळ हा नुसचा राडा सुरू होता, अन अन्य प्रेक्षक पाहात होते. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी सुरक्षारक्षक यांचेही नियोजन केले होते. या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला.

दरम्यान, ग्रामस्थांचे योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळे गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला.
लेखकाबद्दल
विजयसिंह होलम
विजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन.... आणखी वाचा

महत्वाचे लेख