अ‍ॅपशहर

कमानीचे काम निकृष्ट

शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात येणाऱ्या दिशादर्शक लोखंडी कमानींचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी निदर्शने केली.

Maharashtra Times 11 Oct 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम work of municipal low class
कमानीचे काम निकृष्ट


शहरातील प्रमुख मार्गांवर उभारण्यात येणाऱ्या दिशादर्शक लोखंडी कमानींचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी निदर्शने केली. तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेले. अखेर निकृष्ट दर्जाचे काम बंद करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

शहरातील प्रमुख मार्गांवर मनपाच्या वतीने लोखंडी कमानी उभारण्याचे काम सुरू आहे. या कमानीच्या एका बाजूने दिशादर्शक फलक तर दुसऱ्या बाजूने जाहिरात फलक लावण्यात येणार आहेत. परंतु, लोखंडी कमानीचे सुरू असलेले काम निकृष्ट असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी मनपा प्रशासनाचा निषेध केला. भविष्यात जोरदार पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे सुद्धा मनपाने उभारलेली लोखंडी कमान पडून अपघात होण्याची शक्यता आहे. यामध्ये जीवितहानी होण्याचा धोका आहे. त्यामुळे लोखंडी कमानी उभारण्याचे काम दर्जेदार करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. या वेळी संबंधित कामाचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला असून निकृष्ट दर्जाचे काम थांबवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित खोसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, संजय झिंजे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज