अ‍ॅपशहर

साखर कारखान्यातील उपोषणकर्त्या कामगाराचा मृत्यू

थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी राहुरी येथील डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरू आहे. यामध्ये सहभागी सेवानिवृत्त कामगार सोपान पुंजाजी जगधने यांचे निधन झाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Dec 2019, 1:50 pm
अहमदनगर : थकीत पगार व अन्य मागण्यांसाठी राहुरी येथील डॉ. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरू आहे. यामध्ये सहभागी सेवानिवृत्त कामगार सोपान पुंजाजी जगधने यांचे निधन झाले. उपोषण मंडपात अस्वस्थ वाटू लागल्याने इतर आंदोलकांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले होते. घरी गेल्यावर त्यांचे निधन झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Sugar-factory-hunger-strike


तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या साखर कामगारांनी थकित वेतन मिळावे त्यासाठी मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हा कारखाना सध्या खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. ऊस टंचाईमुळे यावर्षी कारखाना बंद आहे. त्यातच कारखान्याने बँकेचे कर्ज थकविल्याचा आरोप जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व काही संचालकांनी केला आहे.

कामगारांनीही आपल्या मागण्यांसाठी कारखाना प्रशासनाच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. त्यात सहभागी असलेले सेवानिवृत्त कामगार जगधने यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यावेळी इतर आंदोलकांनी त्यांना घरी पाठविले. त्यानंतर त्यांचे निधन झाले. मात्र, उपोषणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा कामगारांनी केला असून प्रशासन दखल घेत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलीः फडणवीस

दरम्यान, सोपान जगधने हे २०१०मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा पगार कारखान्याकडे थकीत नसून याउलट कारखान्याचेच जगधने यांच्याकडे २० ते ३० हजार रुपये येणे बाकी
असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी दिली. उपोषणकर्त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून कारखाना व्यवस्थापन कामगारांना पगार वाटप करणार आहे.

बैठकीकडे लक्ष; जीएसटी दरवाढ की टळणार?
झोपमोड केल्याने पतीची मारहाण, पत्नीची तक्रार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज