अ‍ॅपशहर

कामगारांचे चोवीस लाख रुपये कापले

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यातील संपात सहभागी झालेल्या कामगारांवर महामंडळाने कारवाई केली आहे.

Maharashtra Times 21 Nov 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम workers cut off 24 lakh rupees
कामगारांचे चोवीस लाख रुपये कापले

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यातील संपात सहभागी झालेल्या कामगारांवर महामंडळाने कारवाई केली आहे. नगर विभागातील संपात सहभागी झालेल्या जवळपास चार हजार कामगारांच्या नोव्हेंबर महिन्याच्या पगारातून २३ लाख ९९ हजार रुपये कपात करण्यात आले आहे. एसटीतील कामगारांना आधीच पगार कमी आहे त्यात पुन्हा पगार कपात झाल्याने कामगार वर्ग नाराज झाला आहे.
एसटी महामंडळातील कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच पदनिहाय वेतन श्रेणी मिळावी या मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी १७ ते २० ऑक्टोबर या दरम्यान संप केला. या संपात राज्यातून एकही एसटी धावली नाही. ऐन दिवाळीच्या गर्दीच्या हंगामातच कामगारांनी संप केल्याने महामंडळास कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. यात महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी कामगारांची पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला संपाचे चार दिवस आधिक ३२ दिवसांचा पगार कापला जाणार होता. परंतु, या निर्णयास जोरदार विरोध झाल्याने महामंडळास हा निर्णय मागे घ्यावा लागला. त्यानंतर फक्त चार दिवसांचा पगार टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी नगर विभागाने केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज