अ‍ॅपशहर

आदित्यजी ‘हीच ती वेळ’ संधी दवडू नका: सत्यजीत तांबे

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला भाजप पेक्षा जागा कमी मिळाल्या आहेत. मात्र, भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेकडून अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी सुरु केली आहे. त्यातच युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Oct 2019, 6:21 am
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला भाजप पेक्षा जागा कमी मिळाल्या आहेत. मात्र, भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेकडून अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी सुरु केली आहे. त्यातच युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना ‘संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही’ असा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Thackeray-Tambe


तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील येणाऱ्या ‘संधी’संदर्भात स्वतः चा अनुभव कथन करीत आदित्य यांना सल्ला दिला आहे. २००७ सालची गोष्ट आहे. माझेही वय २४ चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या. पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती, असं तांबे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


उद्धव ठाकरेंच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल: शिवसेना

सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीच: फडणवीस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज