अ‍ॅपशहर

युवकांची पक्षी वाचवा मोहीम

ग्रामीण भागात कृत्रिम पाणवठे व घरट्यांद्वारे पक्षी वाचवा मोहीम येथील मोरया युवा प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. नुकतीच त्यांनी डोंगरगण येथील विविध झाडांवर मातीची मडकी बांधून त्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली तसेच त्यांच्या घरट्यांसाठीचे काड्याकुड्या व अन्य साहित्य गोळा करून एका ठिकाणी जमा करून ठेवले.

Maharashtra Times 19 Aug 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम youths bird save campaign
युवकांची पक्षी वाचवा मोहीम

ग्रामीण भागात कृत्रिम पाणवठे व घरट्यांद्वारे पक्षी वाचवा मोहीम येथील मोरया युवा प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. नुकतीच त्यांनी डोंगरगण येथील विविध झाडांवर मातीची मडकी बांधून त्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली तसेच त्यांच्या घरट्यांसाठीचे काड्याकुड्या व अन्य साहित्य गोळा करून एका ठिकाणी जमा करून ठेवले.
शहरातील बहुतेक नागरिक हे सणासुदीच्या निमित्ताने साफसफाई करताना घरात अथवा इमारतीतील पक्ष्यांची घरटी काढून टाकतात. ग्रामीण भाग सोडला तर शहरी भागात डेरेदार वृक्षांची संख्या कमी असल्याने आधीच झाडांवर घरटे करू न शकलेल्या या पक्ष्यांचा निवासी घरांतील निवारा काढला गेल्याने ते हवालदिल होतात. निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने ते उन्हाचे बळी ठरतात. त्यामुळे नागरिकांनी इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नये व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवण्याबाबत मोरया युवा प्रतिष्ठानद्वारे जनजागृती मोहीम राबविली जात आहे.
या मोहिमेच्या पुढच्या टप्प्यात आता ग्रामीण भागात पक्ष्यांसाठी झाडांवरच कृत्रिम पाणवठे व घरटी उपक्रम राबवला गेला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ईश्वर पवार, उपाध्यक्ष स्वामी टाकळकर तसेच धीरज पोखरणा, अतीश शिंगरे, सागर शर्मा, मयूर व्यास, मनोज लुणिया, जनार्दन वल्लकट्टी आदींनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. नागरिकांनीही घर तसेच बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाण्याने भरून ठेवणे, शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसविणे, घराच्या परिसरातील गच्ची, बाल्कनीत पक्ष्यांसाठी खाण्याची सोय करणे, कृत्रिम पाणवठय़ातील पाणी वेळोवेळी बदलणे, भांडे स्वच्छ ठेवणे, पिण्याचे भांडे पसरट ठेवणे या सुविधा करण्याचे आवाहनही प्रतिष्ठानद्वारे करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज