अ‍ॅपशहर

नगरः आता पाणी योजनांवर झेडपीची नजर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात येतात. या योजना ग्रामीण भागातही राबविण्यात येतात. या योजनांच्या कामकाजावर आता जिल्हा परिषदेची नजर राहणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स 1 Jun 2019, 4:00 am
नगर :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम water

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात येतात. या योजना ग्रामीण भागातही राबविण्यात येतात. या योजनांच्या कामकाजावर आता जिल्हा परिषदेची नजर राहणार आहे. जिल्हा परिषदेचे उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती सभेत या सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेप्रमाणे जीवन प्राधिकरणाकडूनही पाणी योजनांची कामे केली जातात. या विभागाने योजना पूर्ण केल्यानंतर पाणी वाटप समिती स्थापन करुन योजना जिल्हा परिषदेस हस्तांतरीत करण्यात येतात. असे असले तरी या विभागाबाबत जिल्हा परिषदेचे सदस्य नेहमीच तक्रार करत असतात. योजना वेळेवर पूर्ण केल्या जात नाहीत. योजना बंद पडतात अशा तक्रारी असतात. तसेच पाणी योजना हस्तांतरीत करतानाही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत होणाऱ्या सभांत पाणी योजनांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर सदस्य नाराजी व्यक्त करतात. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नसल्याने त्यांनाही याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे अडचणी वाढत आहेत. आता मात्र या अडचणी मिटवण्यासाठी जिल्हा परिषदेनेच पुढाकार घेतला आहे. प्राधिकरण विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीपुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात येतात. या योजनांच्या कामकाजावर आता जिल्हा परिषदेची नजर राहणार आहे. जिल्हा परिषदेचे उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांनी लक्ष ठेवणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा योजना हस्तांतरीत करताना त्रुटी राहणार नाहीत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज