अ‍ॅपशहर

झेडपी सदस्यांविना बैठक

या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक सोमवारी होत आहे. नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची निवडच जिल्हा नियोजन समितीवर झालेली नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांविनाच ही बैठक होत आहे.

Maharashtra Times 19 Jun 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, नगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम zp meeting without members
झेडपी सदस्यांविना बैठक


या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक सोमवारी होत आहे. नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांची निवडच जिल्हा नियोजन समितीवर झालेली नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांविनाच ही बैठक होत आहे. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी एक वाजता ही बैठक होणार आहे. मागील बैठकीचे इतिवृत्तास मान्यता देणे व इतर विषयांवर या बैठकीच चर्चा होणार आहे. ही बैठक आयोजित केली असली तरी जिल्हा परिषद, नगरपालिकांचे सदस्यांची निवडणूक होऊन या समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्या नाहीत. जिल्हा नियोजन समितीत ५० सदस्य असतात. काही निमंत्रित सदस्य नेमले जातात. या समितीतील ३६ जागा रिक्त आहेत. त्यात जिल्हा परिषद सदस्यांच्या ३३, नगरपालिका क्षेत्रातील तीन सदस्य नेमण्यात आलेले नाहीत. त्यात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. इतर जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीवर सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. त्या ठिकाणी बैठका झाल्या आहेत. त्यामुळे नगरच्या बैठक घेण्यात अडचण नसल्याची माहिती जिल्हा नियोजन कार्यालयातून मिळाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष या समितीवर पदसिद्ध सदस्य असतात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे या सभेला बसू शकतात.

या बैठकीला कोरमचा नियम लागू नसल्याने बैठक ही स्थगित करता येत नाही. त्यामुळे ही बैठक होणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांची समितीवर नेमणूक न झाल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आर्थिक वर्षात पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हा परिषदेचा निधी कमी केला होता. त्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विरोध केला होता. त्यामुळे आता होणाऱ्या या बैठकीकडे सर्व विद्यमान तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे लक्ष लागले आहे. यात प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार वाद उफाळून येण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

चौकट ः

सदस्यांसाठी लवकरच निवडणूक

जिल्हा नियोजन समितीवरील रिक्त जागी जिल्हा परिषद व नगरपालिकांचे सदस्य नेमण्यासाठी जिल्हा नियोजन कार्यालयाने प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. या प्रस्तावानुसार निवडणूक होऊन नवीन सदस्य नेमले जाणार आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लवकर निवडणुका घेतल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागाकडून निळाली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज