अ‍ॅपशहर

अकोला विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेनेत लढत रंगणार, दोन्ही पक्षांकडून उमेदवारी जाहीर

विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत तर दोन नंबरवर भाजपचे सदस्य आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ गत निवडणुकीमध्ये अधिक असूनही बाजोरियांनीच गड राखला होता.

Maharashtra Times 20 Nov 2021, 2:39 pm
अकोला : स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये अखेर सराफा व्यावसायिक संस्थेच्या भाजपकडून वसंत खंडेलवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याने आता महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. वसंत खंडेलवाल हे संघ परिवारातील असल्याने त्यांचेच नाव फायनल होईल, अशी चर्चा होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Akola Legislative Council elections


गत निवडणुकीमध्ये खंडेलवाल हे भाजपचे ते दावेदार होते. मात्र, युतीमध्ये ती जागा शिवसेनेच्याच वाट्याला राहिल्याने खंडेलवाल यांना माघार घ्यावी लागली होती. शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपिकिशन बाजोरिया यांची उमेदवारी कायम असली तरी ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेल नाही. असे असले तरी काँग्रेसचे स्थानिक नेते बाजोरिया हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर ठाम आहेत.

वाशीम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे मतदार या मतदानाचा निवडणुकीत अधिकार बजावणार असल्याने मतदार सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत तर दोन नंबरवर भाजपचे सदस्य आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संख्याबळ गत निवडणुकीमध्ये अधिक असूनही बाजोरियांनीच गड राखला होता.

अमरावतीत तब्बल ५५ हजार ग्राहकांना महावितरणची लास्ट वॉर्निंग, 'ही' आहे शेवटची तारीख
गेल्या काही दिवसांपासून बाजोरिया यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध भाजप घेत होती अखेर तोडीस तोड म्हणून वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची म्हटल्यास वावगे राहणार नाही. पण या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे पाठबळ कुणाला?

कारण, वंचित बहुजन आघाडीचे सदस्य संख्या ही ६० च्यावर आहे. या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक असतात. शेवटच्या दिवसापर्यंत वंचित आघाडीची मते कुणाला जाणार हे निश्चित नसते. पूर्व इतिहास पाहता शिवसेनेचे उमेदवार गोपिकिशन बाजोरिया यांच्या बाजूने वंचित आघाडीचा कल राहिला आहे. पण यावेळी वंचित आघाडीचे मतदान भाजपला जाते की महाविकास आघाडीला की त्यांचा स्वतंत्र उमेदवार ठरतो. हे मात्र गुलदस्त्यात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज