अ‍ॅपशहर

संतप्त झालेल्या ४ आमदारांचे तब्बल ९ तास ठिय्या आंदोलन, अखेर...

अकोला जिल्ह्यातील चार आमदारांनी ठिय्या आंदोलन करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दुपारपासून ते रात्रीपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसचिन फुलपगारे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2022, 1:13 pm
अकोला : जिल्ह्यातील अकोट-तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांची कामे चार वर्षांत १३ टक्केच झाली. अखेर संयमाचा बांध फुटला अन् भाजपच्या चार आमदारांसह कार्यकर्त्यांनी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम four bjp mlas protest at pwd department in akola
संतप्त झालेल्या ४ आमदारांचे तब्बल ९ तास ठिय्या आंदोलन, अखेर...


आंदोलकांनी अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला. अखेर अभियंत्यांनी कामांबाबत आश्वासन दिल्याने समोवारी रात्री आंदोलन स्थगित केले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार मुद्दा मार्गी न लागल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा भाजपने दिला आहे. विधानसभेच्या अकोट मतदारसंघातील आडसूळ तेल्हारा - माळेगाव-वरवटबकाल व झरीबाजार- हिवरखेड-तेल्हारा, घोडेगाव-वणी वारुळा हे दोन रस्ते चार वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. हे काम नागपूर येथील कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले. मात्र चार वर्षांत काम पूर्ण झाले नाही. यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. मात्र काम झाले नाही. परिणामी सोमवारी भाजप आमदार भारसकाळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरिष पिंपळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व अकोट तेल्हारा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी अधीक्षक अभियंता प्रवीण सरनाईक कार्यकारी अभियंता गणोरकर यांच्याशी चर्चा केली.

अप्पर मुख्य सचिवांना पत्र...

रस्त्यांच्या कामाबाबत आमदार भारसाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या नावे पत्र पाठवले. तेल्हारा तालुक्यातील दोन रस्ते ४ वर्षांनंतरही पूर्ण झालेले नाहीत. यापूर्वी अकोल्यात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता गिरीश जोशी हे सध्या मुख्य अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत यापूर्वीही बैठका झाल्या आहेत. मात्र कार्यवाही झाली नाही. यावर आता आपणच निर्णय घ्यावा, अशीही मागणी आमदार भारसाकळे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या आदेशाने अकोला शिवसेनेत खळबळ!, गोपाल दातकर जिल्हा प्रमुखपदी

अशी होणार कामे...

जिल्ह्यातील तेल्हारा व अकोट तालुक्यातील तीन रस्ते १५ जूनपर्यंत आणि एक रस्ता १५ जुलैपर्यंत होईल, अशी ग्वाही बांधकाम विभागातर्फे दिल्याचे भाजपचे म्हणणे आहे. लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी यांनी भाजप आमदारांना दिले. येणारा पावसाळा लक्षात घेत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत राहिल, याची दक्षता घेण्यात येत आहे. नवीन निविदा निश्चित होईपर्यंत रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची कामे सुरू ठेवण्याबाबत अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांचा सूचना दिल्याचेही जोशी यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज