अ‍ॅपशहर

गहाळ झालेली फाईल शोधण्यासाठी मनसेकडून आयुक्तांना कंदील भेट

गायब झालेली फाईल तात्काळ शोधून व संबंधित अधिकारी ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून सदर अहवाल जनतेसमोर आणावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे ह्यांनी केली आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 7 Jan 2022, 8:26 am
अकोला : बहुचर्चित खुले भूखंड घोटाळा प्रकरणातील गहाळ झालेली फाईल शोधण्यासाठी अकोल्यात आज मनसेकडून मनपा आयुक्तांना कंदील देऊन अभिनव आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Lantern gift from MNS to the Akola commissioner to find the missing file


शहरातील बहुचर्चित खुल्या भूखंड प्रकरणी सत्ताधारी भाजपने एक चौकशी समिती गठीत केली होती. त्या समितीतील नियुक्त पदाधिकाऱ्यांनी संबंधित अहवाल नगररचना विभागाला सुपूर्द केला होता. पण प्रत्यक्षात तो अहवाल कधी जनतेसमोर आलाच नाही. सध्या त्या अहवालाची चौकशी केली असता नगर रचना विभागाने त्या चौकशी अहवालाची फाईल गायब झाल्याचे सांगितले आहे.

एवढ्या गंभीर बाबतीत प्रशासनाची गाफील भूमिका सध्याच्या सत्ताधारी ह्यांचा बाजूने दिसत आहे. या प्रकरणी अहवाल देणारे भाजप सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प बसले आहेत. या प्रकरणात निश्चितच मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा आहे.

त्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाला धरुन मनपा आयुक्तांना कंदील भेट देऊन याप्रश्नी वाचा फोडली आहे. गायब झालेली फाईल तात्काळ शोधून व संबंधित अधिकारी ह्यांच्यावर गुन्हे दाखल करून सदर अहवाल जनतेसमोर आणावा अशी मागणी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे ह्यांनी केली आहे.

यावेळी शहर अध्यक्ष सौरभ भगत, शहर अध्यक्ष राकेश शर्मा, प्रदेश उपाध्यक्ष आदित्य दामले, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, शहर सचिव अॅड अजय लोंढे, अॅड नंदकिशोर शेळके विधी विभाग, सचिन गव्हाळे, जिल्हा उपाध्यक्ष मनविसे जय मालोकार, विभाग अध्यक्ष मिलिंद मुळतकर, गोपाल वाघ, विनायक नंदगवळी, तेजस भांडे आदी मनसैनिक उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज