अ‍ॅपशहर

प्रकाश आंबेडकरांचा PM मोदींवर निशाणा, 'अर्थव्यवस्थेची अवस्था दारुड्यासारखी झालीय'

Akola News : देशातील वाढती महागाई थांबवावी, हे आमचे पंतप्रधान मोदींनाआवाहन आहे. महागाई थांबली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हे आर्थिक संकट वाढल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यासोबतच आंबेडकर यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून थेट पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे. शरद पवारांवरही त्यांनी निशाणा साधला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2022, 8:55 am
अकोला : सरकारने कापूस खरेदी पणन महासंघातर्फे करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी ( Prakash Ambedkar ) केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित धम्म मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील सत्तांतरण हे पैशांच्या जोरावर झाले आहे. सत्ताधारी पक्ष हा भांडवलदारांचा असून अर्थव्यवस्थेची अवस्था दारुड्यासारखी झाल्याचे म्हणत त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ( PM Modi ) टिकास्त्र डागले. परिस्थिती अशीच राहिल्यास प्रचंड आर्थिक संकट ओढावेल. महागाई नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ही प्रयत्न करावेत, असे आवाहनही अँड आंबेडकर यांनी केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prakash ambedkar on pm modi
प्रकाश आंबेडकरांचा PM मोदींवर निशाणा, 'अर्थव्यवस्थेची अवस्था दारुड्यासारखी झालीय'


आंबेडकरी चळवळीतील मंत्र्यांच्या खुर्चीला चिकटून असलेल्या नेते व त्यांच्या पाठिशी उभे राहणाऱ्या विचारवंतांना आंबेडकर यांनी फैलावर घेतले. लोकसेवक म्हणून सत्ता चालविणारे हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. लोकशाही टिकायला हवीच आणि विचार स्वातंत्र्याही अबाधित राहायला हवे. यासाठी सर्वांनी एकजूट राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. आगामी सरपंच पदाची निवडणूक पक्ष म्हणून लढणार असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले. कार्यकर्त्यांनी पक्षासोबत राहून पदाधिकाऱ्यांनी सांगिलेल्या बाबींचे पालन करावे, अशी सूचना त्यांनी केली. आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अनेकांनी सत्ता मिळविली. काही तर कायम स्वरुपी खुर्चीला चिकटून बसले आहेत. अशांना कायमचे मंत्रिपद दिले पाहिजे, असा टोला आंबेडकर यांनी नाव न घेता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना लगावला.

मंत्रिपद कायम राहण्यासाठी येड्यासारखी बडबड, प्रकाश आंबेडकरांनी जनसमुदायाच्या साक्षीनं आठवलेंना

बाळासाहेब ठाकरेंचा तो गाजलेला किस्सा

बाळासाहेब ठाकरे यांचे एक उदाहरण आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. दादू इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न हे नाटक. या नाटकांमध्ये इंदुरीकरांनी काही देवतांची टिंगल उडवली होती. त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी ही टिंगल उडवली होती. यामुळे तुमचे नाटक होवू देणार नाही, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना दिले होते. यावर इंदुरीकर म्हणाले, माझे नाटक बघायला या आणि ते मला बंद करून दाखवा. बाळ ठाकरे आले नाटकाला. आणि त्या नाटकामध्ये इंदुरीकर म्हणाले, आज माझ्या सोबत ढाण्या वाघ बसलेला आहे. त्यानंतर बाळ ठाकरे उठले आणि दादू इंदुरीकरांना मिठी मारली आणि हे वाक्य सगळ्या शोमध्ये झाले पाहिजे. हा माझा तुला असणारा अधिकार आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. हा दिलदारपणा मोदींमध्ये आहे का, शरद पवारांमध्ये आहे का? अशी कुणीतरी टीका करतात सहन करा, कारण लोकशाहीचे नेते आहात तुम्ही. यांना वाटलं त्याला पंधरा दिवस, महिना आतमध्ये टाकतात. याला लोकशाही म्हणत नाहीत. याला दादागीरी म्हणतात. याला हुकूमशाही म्हणतात. आणि म्हणून या हुकूमशाहीच्या विरोधात आपल्याला लढायचे आहे आणि आपण लढत राहू, असे प्रकाश आंबेडर म्हणाले.

आपली सगळी शौर्यता सिनेमांमध्येच, पाकिस्तानबाबत घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे प्रकाश आंबेडकरांची मोदींवर

महत्वाचे लेख